🌟पुर्णेत जय संघर्ष वाहनचालक संघटने तर्फे 'हिट अँड रन' या जाचक कायद्या विरोधात भव्य रस्तारोको आंदोलन संपन्न....!


🌟यावेळी संघटनेचे नेते संजय हलनोर यांची प्रमुख उपस्थिती🌟 

पुर्णा (दि.१५ जानेवारी) - जाचक असलेल्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात संमस्त वाहनचालक बांधवांत संतापाचे वातावरण असुन हा कायदा रद्द करावा तसेच बाळासाहेब ठाकरे रस्ता सुरक्षा योजना त्वरित लागु करावी या व ईतर मागण्यासाठी पुर्णा जय संघर्ष वाहनचालक आणि मालक संघटनेतर्फे ताडकळस टी पॉइंट येथे भव्य रस्ता रोको करून शासनाचा निषेध करण्यात आला.


दरम्यान यावेळी उपस्थित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय हळनोर यांनी वाहनचालक आणि मालक यांच्या भावना तीव्र शब्दात व्यक्त करून हा कायदा का रद्द करण्याची आवश्यकता आहे त्याबद्दल माहिती दिली तसेच यावेळी केंद्र सरकार चा हा कायदा रद्द करावा यासाठी मोठी घोषणा बाजी सुद्धा करन्यात आली जवळपास एक तासभर हे रास्तारोको आंदोलन सुरू होते, त्यानंतर पोलीस निरीक्षक काकडे यांच्या सुचने नुसार रोखलेल्या वाहनांना रस्ता मोकळा करण्यात आला.

यावेळी संघटनेचे नेते संजय हलनोर यांच्यासह सुरेश बायस,जिल्हाध्यक्ष सुरेश बायस,राहुल पुंडगे महारष्ट्र प्रदेश सचिव, केरबा लोखंडे पुर्णा तालुका अध्यक्ष यांच्यासह असंख्य वाहनचालक, मालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या