🌟परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन...!


🌟आयुष्यमान कार्ड ई-केवायसी करुन काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे🌟 

परभणी (दि.03 जानेवारी) :  आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत पात्र लाभार्थींना आरोग्य विमा योजनेचा 5 लाख रुपयार्पंतचा लाभ सहजरित्या उपलब्ध व्हावा यादृष्टीने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपण आपले नाव आयुष्यमान ॲपमध्ये आहे किंवा नाही याची खात्री करुन आपण आपले आयुष्यमान कार्ड ई-केवायसी करुन काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

या योजने मध्ये सर्व चालू रेशन कार्ड धारक (पांढरे रेशन कार्ड वगळून) लाभार्थी असून जिल्ह्यात  12 लाख 22 हजार 571 लाभार्थी असून या पैकी 3 लाख 62 हजार 840 लाभार्थींची ई-केवायसी  पूर्ण झालेली आहे. उर्वरित 8 लाख 59 हजार 731 लाभार्थींची ई-केवायसी प्रलंबित आहे. केंद्र शासनाने आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत लाभार्थ्याचे ई-केवायसी करण्यासाठी BIS 2.0 चे आयुष्यमान ॲप तयार केले आहे. आपले सरकार सेवा केंद्रचालक, ग्रामपंचायत कार्यालय, सीएससी, व्हीएलई व आशा स्वयंसेविका यांना लॉगिन उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तसेच लाभार्थींना स्तत:च्या लॉगिन मधूनही ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनाचे पुढील प्रमाणे रुग्णालयात 1 हजार 356 आजारासाठी मोफत उपचार करण्यात येत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी, स्त्री रुग्णालय परभणी, अस्थिव्यंग रुग्णालय परभणी, उपजिल्हा रुग्णालय, गंगाखेड, उपजिल्हा रुग्णालय, सेलू, ग्रामीण रुग्णालय, जिंतूर, मानवत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मानवत, ओन्क क्युअर कॅन्सर सेंटर, डॉ. प्रफुल्ल पाटील हॉस्पिटल, परभणी , आर पी हॉस्पिटल, पेडगाव, पांडुरंग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, परभणी, स्वाती क्रिटी केअर हॉस्पिटल,परभणी,स्पर्श मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,परभणी....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या