🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.......!


🌟कंठ दाटला,आवंढा गिळला ; लहानपणी अशा घरात रहायला मिळायला हवं होतं सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक🌟

✍️ मोहन चौकेकर

* राम मंदिराच्या गाभाऱ्यात प्रभू रामचंद्रांची मूर्ती, अयोध्येतील रामलल्लाच्या पहिला फोटो समोर

* महाराष्ट्रातही 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेनिमित्त राज्य सरकारचा निर्णय

* सांगली शहरात अल्पवयीन मुलीचे फिल्मी स्टाईलने अपहरण, मुलीच्या आईवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

* आधी रोहित पवार, आता किशोरी पेडणेकर, एकाच दिवशी महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांना ईडीचं समन्स

* विकसित भारत संकल्प यात्रेचा सांगली महापालिका क्षेत्राचा समारोप

* कंठ दाटला, आवंढा गिळला; लहानपणी अशा घरात रहायला मिळायला हवं होतं, सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक

* राज्यातही पुन्हा डबल इंजिन सरकार बनणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

* मूर्ती मूळ ठिकाणापासून बाजूला बसवली, मंदिर वही बनाएंगे म्हणणाऱ्यांनी भूमिका बदलली; शरद पवारांचा हल्लाबोल सुरू

* मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर; रोहन पाटील साकारणार मनोज जरांगे पाटील यांची भूमिका

* प्रकाश आंबेडकर कोणाच्या निमंत्रणाची वाट बघतायत; इंडिया आघाडीत यायंच असेल तर त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घ्यावी, पृथ्वीराज चव्हाणांचं मोठे विधान

* सांगलीतील कवठेएकंदमध्ये ५० एकर ऊस जळून खाक, चार दिवसांत दुसरी घटना

* राम मंदिर उदघाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, राज्य सरकारचा निर्णय

* श्रीरामाबद्दल सर्वांच्या मनात आदर, पण निवडणुकांसाठी रामाच्या नावाचा वापर केला जातोय, सोलापुरात शरद पवारांचा घणाघात

* महायुती सरकारने 8000 कोटींचा महाघोटाळा केला, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

* राममंदिर उद्घाटनाचा नाशिकमध्ये उत्साह; नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे तब्बल 15 हजार साजूक तुपातील मोतीचूर लाडूंचे होणार वाटप

* उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर, तर विदर्भ आणि मराठवाड्यात साधारण थंडी, पुढील 5 दिवस नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, उत्तर सातारा तसेच छत्रपती संभाजीनगर व जालन्यात थंडी जाणवणार*

* सोलापूर दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 9 प्रकल्पांसह बहुचर्चित रे नगर गृहनिर्माण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा संपन्न

* कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने बजावलं समन्न्स

* मराठा आरक्षणासाठी सरकार कुणबी नोंदीचा सांगत असलेला 54 लाखांचा आकडा फसवा, प्रकाश आंबेडकरांचा दावा

* 'शार्क टँक इंडिया 3' हा कार्यक्रम येणार प्रेक्षकांच्या भेटीस; या कार्यक्रमाचा तिसरा सीझन 22 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या