🌟सावित्रीमाईंनी दिलेलं जपण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची - सौ. वर्षा गोविंद यादव


🌟व्यकटेश विद्यालयात जयंती ऊत्साहात साजरी🌟

गंगाखेड : टोकाचा संघर्ष करून फुले दांपत्याने शिक्षणाची दारे सगळ्यांसाठी खुली केली. सावित्रीमाई फुले यांनी आपल्याला जे मिळवून दिलंय, ते जपण्याची जबाबदारी आता विद्यार्थ्यांचीच आहे. ती त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे, असे प्रतिपादन गंगाखेड नगर परिषदेच्या माजी बांधकाम सभापती सौ. वर्षा गोविंद यादव यांनी केले. 


गंगाखेड येथील व्यंकटेश विद्यालयात क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांची जयंती ऊत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य दिलीपराव जोशी सर होते. विचारमंचावर सौ. सविता भुरे ( टेकाळे ),प्रा. ज्ञानोबा रानगीरे सर यांची प्रमुख ऊपस्थिती होती. 

या प्रसंगी  बोलताना सौ.वर्षा यादव यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. सावित्रीबाईंमुळेच आज महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणामुळे मिळत असलेले हे यश टिकवून ठेवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांचीच असल्याचे सौ. यादव यांनी सांगितले.  


प्रास्ताविक प्राचार्य दिलीप जोशी सर यांनी, सुत्रसंचालन प्रा. योगीराज बदने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळासाहेब राखे, प्रा. प्रल्हाद टेकाळे, आनंद जोशी, सचीन हराळे, राजू देशमुख, प्रज्ञाकर मुळे, गुंडेराव देशपांडे, गोविंद दासरवाड आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ऊपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या