🌟शहरवासीयांनों बाहेर जाताय,शेजाऱ्यांना सांगा’ : असे आवाहन पोलीस अधिक्षक आर.रागसुधा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले🌟
परभणी (दि.19 जानेवारी) : परभणी शहरात 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान हजरत सय्यद तुराबुल हक्क साहब दर्गा यांचा ऊर्स भरणार असून, यानिमित्त शहरात बाहेरील गुन्हेगार चोऱ्या घरफोड्या करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर जाताना कुलूप लावल्यानंतर शेजाऱ्यांना सांगून बाहेर पडावे. त्यामुळे गुन्हेगारीस आळा बसेल असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आर. रागसुधा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. यात्रेनिमित्त घराभोवती अनोळखी व्यक्ती संशयितरित्या फिरत असल्याचे आढळून आल्यास संबंधित पोलीस स्टेशनला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कालावधीत यात्रेला येणाऱ्या भाविकांना होणारा संभाव्य धोका, अडथळा आणि गैरसोय टाळण्यासाठी परभणी शहरातील पोस्ट कॉलनी, सावरकर नगर ते दर्गा रोडकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी ॲटोरिक्षा, चारचाकी वाहन, मोटारसायकल, जीप, कार आणि जनावरे घेऊन जाण्यासाठी बंद राहील. तर दुचाकी, चारचाकी वाहने आणि रिक्षा हे जुना पेडगाव रोड एसटी बस मार्गानेच दर्ग्याकडे जातील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.....
*****
0 टिप्पण्या