🌟पुर्णा सारख्या ग्रामीण भागात औषधी निर्मितीचा कारखाना थाटण्याचे धाडस करणारे धाडसी तरुण उद्योजक नितीन कापसे....!



🌟तरुण उद्योजक नितीन कैलास कापसे यांचे कर्तृत्व नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी🌟 

(०६ जानेवारी २०२४ रोजी शहिद सरदार उधमसिंघ फाउंडेशन महाराष्ट्रच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात आपल्या स्वकर्तृत्वाने स्वतःचे वर्चस्व निर्माण करणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वांचा 'समाज भुषण' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्यातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे औषधी उद्योग क्षेत्रातील युवा उद्योजक 'समाज भुषण' नितीन कैलास कापसे)

'मान्यवरांच्या हस्ते समाज भुषण हा सर्वोच्च पुरस्कार स्विकारताना युवा उद्योजक श्री नितीन कैलास कापसे'

लेखक - चौधरी दिनेश (रणजित)

पुर्णा शहरातील एका व्यापारी कुटुंबात तरुण उद्योजक नितीन कैलास कापसे यांचा जन्म झाला या मातीत लहाणाचे मोठे होत त्यांनी उच्च शिक्षण घेतले एम.फार्म शिक्षण घेतल्यानंतर चाकोरीबद्ध नोकरी किंवा औषधी विक्रीचा व्यवसाय न करता त्यांनी आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर औषधी निर्मिती कारखाना उभारण्याचे स्वप्न पाहीले व ते स्वप्न प्रत्यक्षात साकार केले तसे बघितले तर औषधी निर्मिती कारखाना उभारण्याचे मोठे धाडसाचे पाऊल होते पुर्णे सारख्या ग्रामीण भागात औषधी निर्मितीचा कारखाना थाटणे हे सोपं काम नव्हते पण याच क्षेत्रातील शिक्षण घेतलेल्या आपल्या सहचारिणी सौ.अंकीता नितिन कापसे यांची समर्थ साथ मिळाल्याने व कापसे कुटुंबाने प्रोत्साहन दिल्याने आपले स्वप्न सत्यात उतरविण्याचा त्यांचा मार्ग प्रशस्त झाला तब्बल ०१ कोटी २० लक्ष रुपयांची गुंतवणूक करुन त्यांनी "धनेश्वरी हेल्थ केअर प्रा.लि.पुर्णाच्या माध्यमातून औषधी निर्मितीचा भव्य प्रकल्प उभा केला.

देशासह राज्यातील कोरोना महामारी काळात मराठवाड्यात सॅनिटायझरचा प्रचंड तुटवडा होता यावेळी त्यांनी रात्रंदिवस कष्ट उपसत ही तुट भरुन काढत त्याचा महाराष्ट्रभर पुरवठा केला हे त्यांचे कौतुकास्पद कार्य अद्वितीय आहे.या बरोबरच विविध प्रकारची उपायकारक औषधी निर्मिती देखील ते करीत आहेत एक पुर्णेकर म्हणून तमाम पुर्णेकरांना त्यांचा सार्थ अभिमान आहे.

त्यांच्या हातून असेच कार्य उत्तरोत्तर घडों मानव सेवेचा वसा घेऊन ते करीत असलेल्या या व्यवसायास दैनिक क्रातिशस्त्र व शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्र परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा....

टिप - काही वाचकांच्या आग्रहास्तव लेखाला पुनः प्रसिध्दी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या