🌟वसमत-दगडगाव बसला वसमत ते म्हातारगाव पर्यंत चालवण्याची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी....!


🌟महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने वसमत आगार व्यवस्थापकांना देण्यात आले निवेदन🌟 


हिंगोली/वसमत : हिंगोली जिल्ह्यातील वसमत ते दगडगाव पर्यंत असणारी बस सेवा वसमत ते म्हातारगाव पर्यंत चालू करण्यात यावी. यासाठी म्हातारगावच्या 30 विद्यार्थींनींच्या स्वाक्षरीचे पत्र व निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वसमत बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक यांना देण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष महेश टोंपे पाटील,शहर उपाध्यक्ष कृष्णा तलवारे,युनिट अध्यक्ष सतिश कुरूंदकर,महाराष्ट्र सैनिक कन्हैया जाधव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.....
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या