🌟नांदेड येथील अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट...!(
फोटो : आर्टलेरी सेंटर नाशिक आणि पंजाब पोलीस संघा दरम्यान खेळाचे दृश्य)

🌟आर्टलेरी सेंटर नाशिक आणि एमपीटी मुंबई मध्ये शेवटची लढत : तिसऱ्या स्थानासाठी पंजाब पोलीस आणि एसजीपीसी लढणार🌟


नांदेड (दि.16 जानेवारी) : येथील खालसा मिनी स्टेडियम मैदानावर सुरु असलेल्या 50 व्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंटची अंतिम लढत आर्टलेरी सेंटर नाशिक आणि एमपीटी मुंबई संघादरम्यान खेळविली जाणार आहे. तर तिसऱ्या स्थानासाठी पंजाब पोलीस आणि एसजीपीसी संघात उद्या सामना होईल.


मंगळवारी दुपारी उपांत्य फेरीचा पहिला सामना आर्टलेरी सेंटर नाशिक आणि पंजाब पोलीस संघ यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांनी आक्रमक असा खेळ प्रदर्शित केला. खेळाच्या 18 व्या मिनिटास पंजाब संघाचा कर्णधार करणबीरसिंघ याने पेनल्टी कॉर्नर मध्ये गोल नोंदवत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण नाशिक संघाने जिगरीचा खेळ कौशल दाखवत खेळाच्या 39 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नर मध्ये मनप्रीत चीमाच्या माध्यमाने सुरेख गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर दोन मिनिटानंतर संजय तिडूने मैदानी गोल करत नाशिक संघाला आघाडी मिळवून दिली. पंजाब पोलिसांनी अनेक आक्रमण केले पण अपयश आले. नाशिक संघ विजयी होऊन अंतिम लाढतीसाठी पात्र ठरला.


दूसरा उपांत्य फेरी सामना एमपीटी मुंबई आणि शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटी अमृतसर संघात खेळला गेला. मुंबई संघाने हा सामना 2 विरुद्ध 0 गोल अंतराने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. मुंबई संघाने 20 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोक मध्ये पहिला गोल करण्यात यश मिळवले. धैर्यशील जाधव ने हा गोल साधला. नंतर दोन्ही संघांनी एकमेका विरुद्ध गोल करण्यासाठी झुंज दिली. खेळाच्या शेवटच्या क्षणी विनायक हांडे यानी निर्णायक गोल करत संघासाठी शेवटच्या सामन्यासाठी टिकिट निश्चित केला.

उद्या सकाळी 10.30 वाजता अंतिमस्थानासाठी एमपीटी मुंबई आणि आर्टलेरी सेंटर नाशिक संघादरम्यान सामना खेळला जाईल. तसेच सकाळी 9 वाजता पंजाब पोलीस आणि एसजीपीसी अमृतसर मध्ये लढत होईल. श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंटचे अध्यक्ष माजी नगरसेवक गुरमीतसिंघ नवाब यांनी आवाहन केले आहे की खेळ प्रेक्षकांनी अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित राहावे.

- रविंद्रसिंघ मोदी - नांदेड 

9420654574टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या