🌟गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या कार्यालयात मॉं साहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन....!


🌟त्यांच्या प्रतिमेस आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन🌟

गंगाखेड : गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी स्वराज्य माता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आज शुक्रवार दि.१२ जानेवारी रोजी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

छ.शिवाजी महाराज यांना घडवून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्यात जिजाऊ मातेचे खूप मोठे योगदान होते. कारण, जनतेवर होणारा अन्याय व अत्याचार त्यांना मान्य नव्हता. म्हणून स्वाभिमानाची ज्योत त्यांनी छ.शिवाजी महाराज यांच्या मनात पेटवली होती. तसेच अतुलनीय योगदान स्वामी विवेकानंद यांचेही आहे. तरूणांना आजही विवेकानंदाचे विचार लागू होतात. त्यामुळे ते समजून घेतले पाहिजेत, असे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी सांगितले.

यावेळी मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, कृउबा उपसभापती संभाजीराव पोले, संदीप राठोड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या