🌟परभणी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने १८ जानेवारी पासून नमो चषक क्रीडा स्पर्धांचे आयोजन....!


🌟स्पर्धेत नाव नोंदणीसाठी 18 जानेवारी अंतीम तारीख🌟  

परभणी : परभणी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने नमो चषक क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धांमधून क्रिकेट,हॉलीबॉल,चित्रकला व रांगोळी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

           परभणी विधानसभा मतदारसंघात या निमित्ताने विविध स्पर्धा होणार असून त्या स्पर्धेतील इच्छुकांची काल मंगळवार दि.१६ जानेवारी २०२४ पासून नाव नोंदणीस सुरुवात करण्यात आली असून दि.१८ जानेवारी २०२४ रोजी नाव नोंदणीची अंतीम मुदत असणार आहे. त्याच दिवसापासून विविध स्पर्धांना प्रारंभही होणार असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपये,द्वितीय पारितोषिक ३१ हजार तर तृतीय पारितोषिक ११ हजार रुपयांचे ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रमुख आनंद भरोसे,परभणी महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख व परभणी जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय डहाळे यांनी केले आहे. क्रिकेट नोंदणी करीता मुकेश गाडे (7276999283), हॉलीबॉल स्पर्धेसाठी हनुमान भालेराव (7666730560), चित्रकला स्पर्धेसाठी ओम मुदीराज (8975339090) व रांगोळी स्पर्धेसाठी आनंता गिरी (8600973552) यांच्याशी सोबत दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असेही आवाहन हम आयोजकांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या