🌟पुर्णा-ताडकळस रस्त्यावर बोलेरो जीप-उसाच्या ट्रॅक्टरचा भिषण अपघात....!


🌟पुर्णा-ताडकळस रस्त्यावरील पुनकळस पाटी जवळ घडली अपघाताची घटना : घटनेत ०६ जन जखमी🌟

पुर्णा : पुर्णा तालुक्यातील पुर्णा-ताडकळस राज्यमार्गावरील पुनकळस पाटीलगत काल ०८ जानेवारी २०२३ रोजी रात्री ११-०० वाजेच्या सुमारास ऊसाचे ट्रॅक्टर व बोलेरो जीप मध्ये झालेल्या भिषण अपघातात ०६ जन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

या घटने संदर्भात सविस्तर माहिती अशी की पुर्णा-ताडकळस रस्त्याने नांदेड येथील रहिवासी काही जन आपल्या बोलेरो जीपने सिरसम येथे वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते कार्यक्रम संपल्यावर रात्री बोलेरो जीपने नांदेडकडे जाण्यासाठी येत असतांना ताडकळस लगतच असलेल्या पुनकळस पाटीलगत उसाने भरलेल्या ट्रॅक्टर व बोलेरो जीपचा भिषण अपघाताची घटना घडली या घटनेत बोलेरो जीप मध्ये बसलेल्या पुर्णा येथील सुरेखा नागोराव भालेराव वय ४२ वर्ष,कोमल नागोराव भालेराव वय १४ वर्ष,भुषण राजकुमार भालेराव वय ०७ वर्ष,सुचिता सुखदेव चित्ते वय १९ वर्ष राहणार नांदेड,सरस्वती प्रभाकर हनमंते वय ६० वर्ष राहणार नांदेड,सागरबाई पांडुरंग सावंत वय ६० वर्ष राहणार हैद्राबाद हे जखमी झाले आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या