🌟भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या मराठवाडा अध्यक्षपदी स.गुरुदीपसिंग कुलदीपसिंग संधू यांची निवड....!


🌟अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांच्या हस्तें नियुक्तीपत्र प्रदान🌟

नांदेड (दि.२३ जानेवारी) - भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चा शिख समाज मराठवाडा अध्यक्षपदी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले युवा नेतृत्व गुरुदीपसिंग कुलदीपसिंग संधू यांची अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांनी निवड जाहीर केली आहे. 

     शिक समाजातील धडाडीचे युवा कार्यकर्ते गुरुदीपसिंग कुलदीपसिंग संधू यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अल्पसंख्याक मोर्चा शिख समाज मराठवाडा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानिर्देशानुसार इद्रिस मुलतानी यांनी सदर निवड केली असून यावेळी गुरुदीपसिंग संधू हे पक्षाचे ध्येय धोरणांचा व कार्याचा प्रभावीपणे प्रचार प्रसार करून पक्ष संघटन बळकट व मजबूत करण्यासाठी पक्षाच्या संविधानाचे पालन करीत अहोरात्र मेहनतकरून पक्ष संघटन मजबूत करतील अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी व्यक्त केली आहे.

    गुरुदीपसिंग कुलदीपसिंग संधू यांची शिख समाज मराठवाडा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सलीम जहागीरदार, अकबर पठाण, प्रतापसिंग खालसा, डॉ. सचिन पा.उमरेकर यांच्यासह शिख समाजातील मान्यवरांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या