🌟पुर्णेतील महावीर नगरातल्या कोंडवड्याच्या जागेवरील अतिक्रमण काढून त्या ठिकाणी भव्य मंदिर उभारण्याची मागणी....!


 🌟 पुर्णा नगर परिषदे समोर धरणे आंदोलन करण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के यांचा इशारा 🌟    


                                                                                        
पुर्णा (दि.०३ जानेवारी) - पुर्णा शहरातील महावीर नगर येथील नगर पालिकेच्या कोंडवड्याच्या जागेवरील बेकायदेशीररित्या अतिक्रमण करण्यात आले आहे सदरील जागा अंदाजे ऐकून सतशें स्क्वेअर फुट असून १८/३४ इतकी जागा कोंडवाड्याच्या नावे आहे याच्या पूर्वेस शाळा पश्चिमेला व दक्षिनेला रस्ता आहे व उत्तरेला काबरा सेठ यांचे घर आहे जागा नगर परिषदेच्या मालकीची असून या जागेवर माजी महिला नगर अध्यक्ष यांनी २००७ ते २०११ या वर्ष्याच्या कार्यकाळत या जागेवर मंदिराचा ठराव पारित केलेला आहे या अचूक माहितीच्या आधारावर नगर पालिकेने या कोंडवाड्याच्या जागेवरील बेकायदेशीर अतिक्रमण तात्काळ काढावे व नगर पालिकेने ही जागा भव्य मंदिरासाठी आरक्षीत करावी.                                                                  

पुर्णा शहरातील महावीरनगर हे भगवान महावीर यांच्या नावाने ओळखले जाते या परिसरात भगवान महावीर यांना मानणारा मोठा वर्ग आहे याच भागात हिंदू समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यात आहे या सर्व हिंदू समाज बांधवांनची अशी भावना आहे की ही आहे व या नगर पालिकेच्या मालकी हक्क असलेल्या कोंडवाड्याच्या जागेवर भव्य मंदिर  उभारण्यात यावे अशी मागणी परिसरातील सर्व हिंदू बांधव व मनसे पदधिकारी यांची मागणी आहे याचा गांभीर्याने विचार करावा मुख्याधिकारी यांनी कोंडवाड्याच्या जागेवरील बेकायदेशीर अतिक्रमण काढून या जागेवर भव्य मंदिर उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा.                           

 अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नगर परिषद समोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष रुपेश भैया सोनटक्के ,तालुकाध्यक्ष अनिल बुचाले, शहराध्यक्ष गोविंद (राज )ठाकर ,उपशहर अध्यक्ष पंकज राठोड ,राजेश यादव ,उपशहर अध्यक्ष, अविनाश मैत्रे शहर सरचिटणीस ओम यादव, शहर सचिव, शेख गौस, पवन बोबडे, भारत बोबडे, शशिकांत सूर्यवंशी, आदी कार्यकर्त्यांनी दिला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या