🌟पुर्णा शहरात सोमवार दि.२२ जानेवारी रोजी अयोध्येतील प्रभु श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर भव्य शोभायात्रा....!


🌟शहरातील आनंद नगरातील दक्षिण मुखी हनुमान मंदिर परिसरातून होणार सकाळी ०९-०० वाजता भव्य शोभायात्रेला सुरुवात🌟 


पुर्णा (दि.२१ जानेवारी) - 'माझे शहर माझी अयोध्या' या संकल्पांतर्गत अयोध्येतील रामजन्मभूमी स्थळावर उभारण्यात आलेल्या भव्य श्रीराम मंदिरात उद्या २२ जानेवारी रोजी होणाऱ्या ऐतिहासिक प्रभु श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मोत्सव समिती पुर्णाच्या वतीने पुर्णा शहरात देखील उद्या सोमवार दि.२२ जानेवारी २०२४ रोजी 'उत्सव अस्मितेचा सोहळा परंपरेचा साजरा करण्याच़्या दृष्टीने शहरातील आनंद नगर परिसरातील दक्षिण मुखी हनुमान मंदिर परिसरातून सकाळी ०९-०० वाजेच्या सुमारास प्रभु श्रीराम प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील ऐतिहासिक प्रभु श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर आयोजित भव्य शोभायात्रेस दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथून सकाळी ०९-०० वाजेला सुरुवात करण्यात येणार असून सदरील शोभायात्रा शहरातील  आनंद नगर, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक,कमाल टॉकीज, महात्मा बसवेश्वर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक, सराफा बाजार,मोठा मारोती मंदिर,शहिद सरदार भगतसिंग चौक, छत्रपती शिवाजी महाराज नगर (महादेव मंदिर) परिसर, श्री गुरु बुध्दीस्वामी मठसंस्थान परिसर, शुरवीर महाराणा प्रतापसिंह चौक,श्री दत्त मंदिर परिसर या मार्गाने मार्गक्रमण करीत ही भव्य शोभायात्रा जुना मोंढा परिसरातील श्रीराम मंदिरात पोहोचल्यावर या शोभायात्रेची सांगता व यानंतर महाआरतीसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून अयोध्येतील ऐतिहासिक प्रभु श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुर्णेतील श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने संपूर्ण शहरात भगव्या पताका भगवे ध्वज लावून सर्वत्र धार्मिकतेचे वातावरण निर्माण केले असून या भव्य शोभायात्रेत तमाम हिंदू बांधव/भगिनींसह युवकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या