🌟परभणीत दर्पण दिन उत्साहात साजरा : आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना केले अभिवादन....!


🌟जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध होण्याचा पत्रकारांनी केला निर्धार🌟 

परभणी (दि.06 जानेवारी) :  आपल्या लेखणीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी सतत कार्यरत राहू, असा सूर आज शनिवार दि. 6 जानेवारी रोजी येथे झालेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात पत्रकारांनी व्यक्त केला.

              छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळील पत्रकार भवनात दर्पण दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमास ट्रस्टचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.   याप्रसंगी जेष्ठ पत्रकार म्हणून श्री रमाकांत अण्णा कुलकर्णी यांचा  यथोचित सत्कार करण्यात आला.  यावेळी जेष्ठ पत्रकार तथा भाजपा उद्योग आघाडीचे चंद्रकांत डहाळे, मराठी पत्रकार संघाचे प्रदेश प्रतिनिधी  सुरेश नाईकवाडे, संतोष धारासूरकर, मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष  प्रवीण  देशपांडे, पत्रकार प्रविण चौधरी, पत्रकार दिनकर देशपांडे, प्रमोद बल्लाळ, प्रकाश बारबिंड, सचिन भूरेवार, पवन जाधव, श्रीकांत कुलकर्णी, उमेश गिल्डा, रमेश उर्फ बंडू जोशी, चक्रधर मोरे आदींची उपस्थिती होती.

                यावेळी  सत्काराला उत्तर देताना कुलकर्णी म्हणाले की, बदलत्या माध्यम जगतामध्ये प्रिंट मीडियाचे महत्व अबाधित असून या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधू,  तर धारासुरकर यांनी पत्रकांराच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करु, अशी भूमिका मांडली. नाईकवाडे यांनी पत्रकारांच्या विविध  समस्या असल्या तरी त्यातून मार्ग काढीत जिल्ह्यातील पत्रकारिता उंचीवर कशी नेता येईल यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.  अध्यक्षीय समारोपात बोबडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या सोडवीत जिल्ह्याच्या विकासासाठी  सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन केले. पत्रकार भवनाच्या अद्यावतीकरणाचे कामही निश्‍चितच पूर्ण केले जाईल, असा विश्‍वासही व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धारासुरकर यांनी केले तर आभार दिनकर देशपांडे यांनी मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या