🌟परभणी जिल्ह्यातील युवा मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अजूनही संधी....!


🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडून जिल्ह्यातील युवा मतदारांना नाव नोंदणीचे आवाहन🌟

परभणी (दि.23 जानेवारी) : अंतीम मतदार याद्या प्रसिध्द झाल्यानंतरही मतदार नोंदणीची निरंतर अद्यावत प्रक्रिया सुरु असल्यामुळे अद्यापही नाव नोंदणी न केलेल्या युवकांना मतदार नोंदणीची अजूनही संधी असल्याची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.  


 
 23 जानेवारी रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. मतदारांनी ‘मतदाता सेवा पोर्टल’ या संकेतस्थळावर (https://electoralsearch.eci.gov.in/) जाऊन यादीत आपले नाव तपासावे आणि सर्व तपशील योग्य आहेत का हे पाहावे. सोबतच मतदान केंद्र सुद्धा तपासून घ्यावे, जेणेकरून ऐन वेळी मतदानाच्या दिवशी गैरसोय होणार नाही. तसेच यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी नमुना-6 अर्ज भरून आपला मताधिकार सुनिश्‍चित करावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.

            सर्व राजकीय पक्षांनाही त्यांनी आवाहन केले आहे की, आपापल्या पक्षामार्फत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींच्या नियुक्त्या करून त्यांच्या माध्यमातून मतदारांना यादीत नाव तपासण्यास आणि नावे नसलेल्यांना मतदार नोंदणीस साहाय्य करावे. नागरिकांना मतदार नोंदणी कार्यालयात प्रत्यक्ष मतदार नोंदणी करता येईल. तसेच ‘मतदाता सेवा पोर्टल’ आणि ‘वोटर हेल्पलाइन अ‍ॅप’ यांवर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी गावडे यांनी दिली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या