🌟नांदेडच्या विकासात 'श्री गुरु गोबिंदसिंघजी' नावाचे मोठे योगदान - अशोकराव चव्हाण


🌟विमान सेवा सुरु व्हावी : आर्टिलेरी सेंटर नाशिक लगोपाठ दुसऱ्या वर्षी प्रथम विजेता🌟


नांदेड (दि.17 जानेवारी) : श्री गुरु गोबिंदसिंघजी यांच्या नावाने शहरात गेली पन्नास वर्षें हॉकी स्पर्धा आयोजित होत आहे. गुरुजींच्या नावाने शहर घडले. आमच्या सारख्या व्यक्तिचे विकासात योगदान खूप छोटे आहे खरं म्हंटलं तर नांदेडच्या विकासात 'श्री गुरु गोबिंदसिंघजी' याच नावाचे मोठे योगदान आहे. असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि भोकरचे आमदार श्री अशोकराव चव्हाण यांनी केले. येथे आयोजित 50 व्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंटच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ विजय सतबीरसिंघ, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटीचे सचिव माजी आमदार अमरनाथ राजुरकर, नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक ठानसिंघ बुंगाई, स. बरियामसिंघ नवाब, स. गुरचरनसिंघ घडीसाज, स. रविंदरसिंघ बुंगाई, स. वीरेंद्रसिंघ गाडीवाले, अमितसिंह तेहरा, भागिन्दरसिंघ घडीसाज, राजू येवनकर, दुष्यंत सोनाळे, स. गुरमीत सिंघ नवाब, दीपसिंघ फौजी यांची मुख्य उपस्थिती होती.


आपल्या मनोगतात अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले,डिंपलसिंघ नवाब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्यास्तरावर उत्कृष्टपणे हॉकी स्पर्धा संचालित केली आहे. पण आज हॉकी आयोजन समितीचे एक दिवंगत सदस्य स्व. जसबीरसिंघ चीमा यांचे स्मरण करणे न्यायोचित ठरेल. त्यांनी स्पर्धेसाठी केलेले योगदान विसरता कामा नये.

विविध वक्ताच्या भाषणाचा धागा पकडत श्री चव्हाण पुढे म्हणाले की, नांदेड सारख्या शहराची विमान सेवा सुरु व्हायला हवी. राज्यात डब्बल इंजिनची सरकार असूनही विमान सेवा सुरु होत नाही आहे. गुरुद्वाराच्या दर्शनासाठी येणारे भाविक असो की आम्ही असो सर्वांना विमान सेवेची खूप गरज आहे. नेमकं कुठली अडचन आहे हे कडायला मार्ग नाही. विमान सेवा सुरु करण्यासाठी गुरुद्वारा बोर्डातर्फे प्रयत्न केल्यास शासन निश्चितपणे ही सेवा सुरु करेल याचा मला विश्वास आहे. गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ विजय सतबीरसिंघ यांनी पुढाकार घ्यावा. पुढच्या वर्षी हॉकी खेळाडू देखील विमनाने खेळण्यासाठी यावे अशी सदिच्छा व्यक्त करतांना त्यांनी हॉकी स्पर्धेचे विजेते, उपविजेता सह हॉकी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.अमरनाथ राजुरकर यांनी सुरुवातीला बोलतांना मागणी केली की नांदेड मध्ये हॉकीसाठी पोषक वातावरण असून खेळाडूसाठी सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. तसेच नांदेड येथून विमान सेवा सुरु व्हायला हवी.

नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी आपल्या भाषणात हॉकी स्पर्धांचे उत्कृष्ठ आयोजन झाल्याचे सांगून या स्पर्धेला या पुढे ही सहकार्य करण्यात येईल असे नमूद केले. त्यांनी ही विमान सेवा सुरु करण्यासाठी मंचावर साकळा धरला.गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ विजय सतबीरसिंघ म्हणाले, नांदेडला हॉकी खेळाची जूनी परंपरा आहे. आज पन्नासावी स्पर्धा संपन्न झाली आहे ही मोठी पर्वणीच आहे. पुर्वी सन 1990 मध्ये मी नांदेडला जिल्हा परिषद सीईओ होतो त्यावेळी स्व. शंकररावजी चव्हाण यांनी नांदेडला वायुदूत कंपनीची विमान सेवा सुरु केली होती. कंपनी बंद होई पर्यंत ती विमान सेवा सुरु होती. आज चांगले विमानतळ असून सुद्धा विमान सेवा सुरु होत नाही आहे. पण विमान सेवा लवकर सुरु व्हावी म्हणून बोर्डाच्या वतीने प्रयत्न केले जाईल.


अशोकरावजी चव्हाण आणि प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रथम विजेता संघ आर्टलेरी सेंटर नाशिक, उपविजेता मुंबई पोर्ट ट्रस्ट संघ आणि तृतीय विजेता संघ पंजाब पोलीस यांना गोल्ड आणि सिल्वर कप व नगदी पारितोषिक देऊन गौरव करण्यात आले. तसेच बेस्ट गोलकीपर, बेस्ट फॉरवर्ड, बेस्ट फूल बैक, मैन ऑफ दि मैच आणि मैन ऑफ दी सीरिज पुरस्कार देखील वितरित करण्यात आले. या वेळी जीतेन्द्रसिंघ खैरा, हरविंदरसिंघ कपूर, हरप्रीतसिंघ लांगरी, संदीपसिंघ अखबारवाले, महेंद्रसिंघ लांगरी, जसप्रीतसिंघ काहलो, अमरदीपसिंघ महाजन, विजय नन्दे, महेंद्रसिंघ गाडीवाले, प्रा. डॉ जुझार सिंघ सिलेदार, नानकसिंघ घडीसाज, खेमसिंघ पुजारी, विजयप्रकाश मगनूरकर यांनी प्रमुख अतिथी आणि खेळाडूँचे सत्कार केले. तसेच रणजीतसिंघ चिरागिया, हरनामसिंघ मल्होत्रा, गुरदीपसिंघ संधू, नरेंद्रसिंघ ढालीवाल, रविंद्रसिंघ मोदी, डॉ हरदीपसिंघ, हरिंदरसिंघ गुलाटी औरंगाबाद सह मान्यवरांची उपस्थिती होती.

.........

पारितोषिक :

प्रथम  :  गोल्ड कप आणि रोख एक लाख रूपये

द्वितीय : सिल्वर कप आणि 51 हजार रूपये

तृतीय :  ट्रॉफी आणि 11 हजार रूपये

पाच उत्कृष्ट खेळाडूंना हॉकी किट आणि मोमेंटो भेट 

..........


-रविंद्रसिंघ मोदी-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या