🌟मोताळा येथील दिवाणी तथा फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न....!


🌟मा.न्यायमूर्ति श्रीमती उर्मिला जोशी-फलके यांच्या शुभहस्ते हस्ते करण्यात आले नुतन इमारतीचे उदघाटन🌟 


✍️ मोहन चौकेकर 

मोताळा : बुलढाणा जिल्ह्यातील राजूरच्या विशाल पर्वतराजीच्या घाटाखालील अत्यंत वर्दळीच्या व बहुतांश खेडे गावांच्या मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या मोताळा या तालुक्याच्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून दिवाणी व फौजदारी न्यायालय सुरू होते परंतु त्यास्तव आवश्यक असलेली स्वतंत्र व स्वत:ची अशी इमारत नसल्याने त्यासाठी सातत्याने होत असलेली मागणी व आत्यंतिक गरज विचारात घेऊन तेथे मलकापूर महामार्गावर भव्यदिव्य अशा आधुनिक काळातील सर्व तांत्रिक सोयीसुविधांनी युक्त अशा नवीन वास्तूची निर्मिती करण्यात येऊन तिचे रीतसर उद्घाटन  मुंबई उच्च न्यायालयाच्या मा. न्यायमूर्ती श्रीमती उर्मिला जोशी - फलके यांच्या हस्ते तथा बुलढाणा जिल्ह्याचे मा. मुख्य जिल्हा न्यायाधीश श्री. स्वप्नील खटी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित उदघाटन सोहळ्यात जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश तथा विधिज्ञ वकील मंडळीं तसेच न्यायालयीन कर्मचारी, पत्रकार व नागरिक यांच्या उपस्थितीत, करण्यात आले. त्यानिमित्ताने मान्यवरांनी न्याय निती परंपरा तथा वैधानिक मूल्यांकनासह नागरिकांच्या जागृती बाबतीत मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा चे माजी अध्यक्ष मा. मोतीसिंह मोहता ( अकोला ), बुलढाणा जिल्हा वकील संघ अध्यक्ष ॲडव्होकेट विजय सावळे तथा बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयातील ज्येष्ठ ॲडव्होकेट विजयकुमार कस्तुरे, ॲड. कवीमंडन, ॲड.आर.एन्.इंगळे,ॲड.महेंद्र काकडे, ॲड. मगर, ॲड. शर्वरी सावजी, ॲड.किरण राठोड, ॲड.विणकर इ. सह मलकापूर, खामगाव, मेहकर, चिखली, देऊळगाव राजा, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, नांदुरा, सिंदखेडराजा, लोणार येथील वकील मंडळी तसेच केंद्रीय मानवाधिकार संगठन, नई दिल्ली चे राष्ट्रीय संघटन सचिव डॉ.बबनराव महामुने इत्यादींसह अनेक प्रतिष्ठितासह असंख्य नागरिक उपस्थित होते.... 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या