🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या....!


🌟परभणी जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष महिला पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर यांना मुंबईच्या पोलीस उपायुक्त म्हणून पद़ोन्नती🌟

* वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजाअर्चा करण्यास कोर्टाची परवानगी ; तळघरातल्या मुर्तीची पुजा करण्यास व्यास परिवाराला  मिळाली परवानगी,जिल्हा न्यायालयाचा आदेश

* राज्यातील 17 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या ; अमोल येडगे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी ; सांगली जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी संदीप घुगे, तर पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांची पुणे येथे बदली

* महाविकास आघाडीत अजून वंचितचा समावेश नाही, प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य

* काँग्रेस 14, उद्धव  ठाकरे शिवसेना  गट 18 , तर राष्ट्रवादी 8 तर उरलेल्या 8 जागांवरुन तिढा, 40 मतदारसंघातील मविआचं जागावाटप जवळपास फायनल*

* हिंमत असेल तर मनोज जरांगें यांनी मंडल आयोगाला  चॅलेंज करावे - छगन भुजबळ ; मंडल आयोगाला आव्हान देण्याच्या हालचाली सुरू - मनोज जरांगे

* मराठा आरक्षणासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये,अजित पवारांच्या आमदारांना सूचना

* संजय राऊतांचे राहुल कनाल यांच्यावर खिचडी घोटाळ्याचे आरोप,तर आरोप सिद्ध करा,अन्यथा खासदारकीचा राजीनामा द्या, राहुल कनाल यांचं संजय राऊतांना चॅलेंज

* राहुल गांधींच्या भारत जोड न्याय यात्रेवर हल्ला,गाडीची काच फुटली

* रोहित पवार यांची ज्या प्रकरणात ED चौकशी, तेच प्रकरण मुंबई पोलिसांकडून बंद, ईडीच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह

* सरकारने काढलेली मराठा आरक्षणाची अधिसूचना अंतिम निर्णय नाही --चंद्रशेखर बाबनकुळे

* परमवीर सिंह यांना सीबीआयने दिली क्किन चिट,खंडणी प्रकरणाचा तपास बंद केला

* परभणी जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष महिला पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर यांना मुंबईच्या पोलीस उपायुक्त म्हणून पद़ोन्नती : तर परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक पदाचा रविंद्र सिंह परदेशी यांच्याकडे पदभार 

* आमदार अनिल बाबर यांचे निधन

* ओबीसी संघटनांकडून जनजागृती यात्रा सुरू ; अध्यादेशातील 'सगेसोयरे' विरोधात कोर्टात याचिका दाखल

* आरबीआयची मोठी कारवाई; Paytm पेमेंट बँकेतील सर्व व्यवहारांवर 29 फेब्रुवारीपासून बंदी

* काँग्रेसी म्हणून जन्मले अन् मरेनही काँग्रेसी म्हणूनच, आमदार प्रणिती शिंदे यांचा स्वच्छ निर्वाळा

* वर्ध्यात दारू पुरवणाऱ्या बार मालकांचे परवाने रद्द होणार, जिल्ह्याच्या सीमेवरील बार-वाईन शॉपवर कारवाईचा बडगा

* झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडी चौकशी, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता; अटक झाल्यास पत्नी कल्पना सोरेन मुख्यमंत्री होणार

* बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्काराचं वादळ; परीक्षांसाठीचं साहित्य बोर्डाकडून घेण्यास नकार

* ‘महाराष्ट्र ड्रोन मिशन’ अंतर्गत राज्यात आता ड्रोन केंद्रांचे जाळे ; सहा विभागीय, बारा जिल्हास्तरीय ड्रोन केंद्रांची निर्मिती प्रस्तावित

* बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि कृती सेनन सध्या त्यांच्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या सिनेमामुळे चर्चेत; हा सिनेमा 9 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार                                                 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या