🌟पुर्णेत शहिद स.उधमसिंघ फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य सन्मान सोहळ्यात दै.क्रांतीशस्रच्या विशेष अंकाचे प्रकाशन...!


🌟शहरातील नगर परिषदेच्या सभागृहात दि.०६ जानेवारी रोजी करण्यात आले होते 'समाज भुषण' सन्मान सोहळ्याचे आयोजन🌟 


पुर्णा : पुर्णा शहरातील नगर परिषदेच्या सभागृहात दि.०६ जानेवारी रोजी दर्पण दिनाचे औचित्य साधून शहिद सरदार उधमसिंघ फाउंडेशन महाराष्ट्रच्या वतीने विविध क्षेत्रातील आठ अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाना 'समाज भुषण' पुरस्कार तर तालुक्यातील विकासात्मक वाटचालीत आपली लेखणी झजवून मोलाचे योगदान देणाऱ्या पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते.


यावेळी परभणी येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक क्रांतीशस्त्र या वृत्तपत्रांच्या 'दर्पण दिन विशेष अंकाचे देखील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले यावेळी सदरील वर्तमानपत्राचे संपादक म्हणून धम्मपाल हानवते यांच्यासह अनेक पत्रकारांचा देखील सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष तथा जेष्ठ नेते उत्तमरावदादा कदम,स्वागताध्यक्षपदी मा.नगराध्यक्ष प्रतिनिधी तथामा.नगरसेवक संतोषअण्णा एकलारे तर प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबईचे राज्य निवडणूक प्रमुख प्राचार्य सुरेश नाईकवाडे,जेष्ठ रिपाई नेते प्रकाशदादा कांबळे, माजी उपनगराध्यक्ष उत्तमभैया खंदारे,बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव स.मनबीरसिंघ ग्रंथी,भारतीय स्टेट बँक पुर्णा शाखेचे शाखा व्यवस्थापक गोपाळ काटोळे,मा.उपनगराध्यक्ष अब्दुल मुजीब अब्दुल हबीब,मा.नगरसेवक अ‍ॅड.राजेश भालेराव मा.नगरसेवक प्रविण अग्रवाल,मा.नगरसेवक सुनील जाधव,अ‍ॅड.रोहिदास जोगदंड आदींची उपस्थिती होती.

यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जेष्ठ समाजसेवी तथा सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे तब्बल दोन वेळेस अध्यक्षपद भुषविलेले आदर्श व्यक्तीमत्व जेष्ठ समाजसेवी सरदार हरमीतसिंघ उर्फ लड्डूसिंघ महाजन, प्रशासकीय क्षेत्रात कार्यरत पुर्णा पोलिस स्थानकाचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक प्रदीपजी काकडे, व्यापार क्षेत्रातील निष्कलंक व्यक्तीमत्व प्रतिष्ठीत जेष्ठ व्यापारी अशोकराव कुल्थे,राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने आपले वर्चस्व प्रस्थापित करणारे शिवसेना अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष हाजी कुरेशी,औषधी उद्योग क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करणारे युवा उद्योजक नितीन कैलास कापसे,शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत  सुहागण सारख्या छोट्याश्या गावात छत्रपती संभाजी महाराज विद्यालयाची स्थापना करुन ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर रोजमजूरांसह गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षणाची सर्वोच्च संधी उपलब्ध करून देणारे हिराजी भोसले, तालुक्यातील माखणी सारख्या छोट्याश्या गाव खेड्यात कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण करणारे शेतकरी जनार्धन आवरगंड,कृषी पुरक उद्योगांतर्गत संत तुकाराम महाराज दुध डेअरीची स्थापना करुन दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय देणारे सुरेश शिंदे या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वांचा हृदयस्पर्शी सन्मान करण्यात आला.

या भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन शहीद सरदार उधमसिंघ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिनेश चौधरी, मुख्य निमंत्रक जगदीश जोगदंड,सचिव स.रविंद्रसिंघ मोदी,सहसचिव देवेंद्र राठोड, सदस्य मा.नगरसेवक सुनिल जाधव यांच्या वतीने करण्यात आले होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या