🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात सहभागी कारसेवकांचा सत्कार संपन्न....!


🌟कारसेवक चंद्रकांत रुद्रवार व रामराव आंबोरे पाटील यांचा सत्कार आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार🌟 

पुर्णा (दि.२२ जानेवारी) - अयोध्या येथे श्रीरामाचे भव्य मंदिर उभारून रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या भव्यदिव्य सोहळ्यात व आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाली. या पार्श्वभूमीवर ताडकळस येथील घोन्सीकर परिवाराच्या वतीने 1992 मध्ये राम जन्मभूमी मुक्तीसाठी झालेल्या कार सेवेत ताडकळस येथून सहभागी झालेले कार सेवक चंद्रकांत रुद्रवार व रामराव आंबोरे पाटील यांचा सत्कार गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी रुद्रवार ,चौधरी ,राम गवते ,भाजपाचे जेष्ठ नेते बालासाहेब आप्पा कापसे ,नंदेश घोन्सीकर ,गोविंद रुद्रवार ,डी.एस.लासे ,छावाचे माधवराव आवरगंड ,ताडकळस मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जवळेकर(स्वामी),कन्हैया धुळगुंडे ,संतोष होनमणे ,नीरज घोन्सीकर ,निखिल घोन्सीकर ,चंद्रकांत बिराजदार ,साई सपकाळ यांचा सह ताडकळस व पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील नागरिकांची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या