🌟पुर्णा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात वंचित बहुजन युवक आघाडीची वज्रमूठ बांधण्यासाठी महत्वपूर्ण बैठक संपन्न....!


🌟परभणी जिल्हा वंचित बहुजन युवक आघाडी युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन🌟 


पुर्णा (दि.२१ जानेवारी) - पुर्णा शहरासह संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण भागात वंचित बहुजन युवक आघाडीची मजबूत वज्रमूठ बांधण्याच्या दृष्टीने आज रविवार दि.२१ श जानेवारी २०२४ रोजी येथील रेल्वे इन्स्टीट्यूट येथे परभणी जिल्हा वंचित बहुजन युवक आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांनी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले या महत्वपूर्ण बैठकी ससम्यक परभणी जिल्हा विधी सल्लागार आकाश गायकवाड,युवा तालुका महासचिव डॉ.सिध्दार्थ कापुरे पूर्णा,युवा तालुका उपाध्यक्ष गोविंद भेने पूर्णा,युवा शहर अध्यक्ष सुनील गवळी पूर्णा,युवा शहर उपाध्यक्ष अजय काळे पूर्णा,पृथ्वी खंडागळे,सम्यक हनवते,सूचित मोरे,जीवन कांबळे,महेश ढवळे,तथागत एंगडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या