🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟 ओबीसी आरक्षणाच्या विरोधात हायकोर्टात याचिका : 7 फेब्रुवारीला मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी🌟

* राम बहुजनांचा आहे, शिकार करुन खाणारा राम मांसाहारी होता, जितेंद्र आव्हाड यांचे वादग्रस्त वक्तव्य.

* जितेंद्र आव्हाडांनी प्रभु श्रीराम बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा संपूर्ण भारतात व संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी निषेध

* सांगली जिल्ह्यात तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; आटपाडी तालुक्यातील तीन युवकांना अटक

* यापुढे सरकारशी चर्चा बंद, मनोज जरांगेंची मोठी घोषणा

* महाराष्ट्रात धृतराष्ट्रांचे सरकार; महानंद गुजरातला नेला तर आम्ही गप्प बसणार नाही, संजय राऊत

* सोलापूरच्या नील गजानन आल्लीशे या पाच वर्षांच्या चिमुकल्याने राजगडाचा किल्ला एका दिवसात चढून केला अनोखा विक्रम

* ओबीसी आरक्षणाच्या विरोधात हायकोर्टात याचिका 7 फेब्रुवारीला सुनावणी

* आता दुधपण गुजरातचे पिण्याचे वेळ या सरकारने आणलीत -- रोहित पवार

* शरदपवारांचं घर फोडणाऱ्या तटकरेंचंही घर फुटलं, जे पेरलं तेच उगवणार, जितेंद्र आव्हाडांचा जहरी वार

* केपटाऊनचं मैदान इतिहासाला जागलं, दुसऱ्या कसोटीत मोहम्मद सिराजनं भगदाड पाडलं

* ओबीसी आरक्षणाच्या विरोधात हायकोर्टात याचिका : 7 फेब्रुवारीला मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी

* मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी 31 डिसेंबर 2024 ही दिली नवीन डेडलाईन; सरकारने हायकोर्टात सुनावणी दरम्यान दिली माहिती

* छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 15 जानेवारीपर्यंत मनाई आदेश जारी; पाच पेक्षा जास्त व्यक्ती जमण्यास देखील मनाई

* 'महानंद' वाचवायचे सोडून गुजरातच्या 'अमुल'ला महाराष्ट्रात मोकळे रान, किसान सभेचा राज्य सरकारवर निशाणा

* मनोज जरांगे यांनी सरकार सोबतच्या चर्चेला दिला पूर्णविराम ; जरांगे यांच्या या निर्णयामुळे आता सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

* नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदारांच्या जामीन अर्जावर राज्य सरकारला नोटीस; पुढील सुनावणी 9 जानेवारीला होणार

* 14 जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे घेण्यात येणार; 45 हून अधिक जागा आम्ही जिंकू अशी आमची तयारी : चंद्रशेखर बावनकुळे

* छगन भुजबळांकडून सावित्रीबाई फुलेंना अभिवादन, शरद पवार गट आक्रमक; दुग्धाभिषेकासह स्मृतीस्थळाचं केलं शुद्धीकरण

 ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या