🌟परभणी येथील रमाबाई आंबेडकर विध्यार्थी वसतिगृह येथे प्रजासत्ताक दिन उत्सहात साजरा....!


🌟जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे अधिकारी स.क.नि.एच. ए.सय्यद यांच्या हस्ते ध्वजारोहण🌟 

परभणी (दि.२६ जानेवारी) शहरातील डॉ. आंबेडकर नगर आय. टी.आय. कॉर्नर जिंतूर रोड येथील रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित रमाबाई आंबेडकर विध्यार्थी वसतिगृह येथे आज दिनांक 26 जानेवारी 2024  रोजी 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

या ध्वजारोहण कार्यक्रमास जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे अधिकारी स.क.नि. मा.एच.ए.सय्यद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष कालवश अशोकराव अंभोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करून राष्ट्रध्वज सय्यद साहेब यांच्या हस्ते फडकविण्यात आला आहे. यावेळी  प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या खेळांचे  बक्षीस वितरनात शैक्षणिक साहित्य सय्यद साहेब यांच्या हस्ते वाटप कारण्यात आले. तसेच वसतिगृहतील उपस्थित सर्व विध्यार्थ्यांना खाऊ स्वरूपात बिस्कीट व चॉकलेट देऊन प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी रनिंग या खेळामध्ये 1 ला आलेल्या एका विध्यार्थ्याला मा. एच. ए. सय्यद यांनी 1000 रुपये बक्षीस देऊन खेळास व विध्यार्थ्यास प्रोत्साहन दिले आहे. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनी  ऋतुजा सहजराव  हिने देशभक्तीपर गीत गाऊन  उपस्थित आमचे मने जिंकली. या ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाचे  सचिव प्रमोद अंभोरे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद समाज कल्याण  विभागाचे समाज कल्याण निरीक्षक  एच ए सय्यद , लोक स्वतंत्र पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष  ज्येष्ठ पत्रकार  दिलीप बनकर, रमाबाईआंबेडकर विद्यार्थी वस्तीग्रह कर्मचारी  प्रकाश वडधुतीकर, प्रियंका अंभोरे, भीमा कोरेगाव मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप वायवळ,  समाजहित अभियान प्रतिष्ठानचे राज्य प्रसिद्धीप्रमुख  शेख अजहर, वंचित बहुजन आघाडीचे  जनसेवक रमेश घनघाव, शिवमभैय्या कोरडे मित्र मंडळ चे संस्थापक अध्यक्ष शिवम कोरडे, नारायण अंभोरे, रमाताई घोंगडे, सरिता ताई अंभोरे, विनोद वाडेकर, विकास भालेराव, सय्यद समीर, सोनू भैय्या, राहुल घोंगडे, सरिता चव्हाण, ईशा घोंगडे, दीपाली घोंगडे,निखिल खाडे, अभिषेक गायकवाड वसतिगृह कर्मचारी विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या