🌟राज्य शासनाच्या शासकीय सुट्ट्यांव्यतिरिक्त स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अधिकारातील सुट्ट्या जाहीर....!


🌟परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यंदाच्या वर्षातील तीन स्थानिक सुट्टया जाहीर केल्या🌟

परभणी (दि.19 जानेवारी) : राज्य शासनाच्या शासकीय सुट्ट्यांव्यतिरिक्त स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अधिकारातील सुट्ट्या जाहीर करण्याच्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यंदाच्या वर्षातील तीन स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत ऊर्स दर्गाह सय्यद शाह तुराबुल हक, परभणी यात्रेनिमित्त शुक्रवार, दि. 02 फेब्रुवारी, 2024, जेष्ठगौरी पुजननिमित्त बुधवार, दि. 11 सप्टेंबर 2024 आणि (चंपाषष्टी) खंडोबा यात्रेनिमित्त शनिवार, दि. 07 डिसेंबर 2024 रोजी अशा एकूण तीन सुट्टया अधिसूचनेद्वारे घोषित केल्या आहेत. 

परभणी जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेअंतर्गंत कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालये व इतर शैक्षणिक संस्थांना या सर्व सुट्टया लागू राहतील. या अधिसूचनेद्वारे लागू केलेल्या सुट्ट्या जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालय, केंद्र शासनाची कार्यालये आणि बँकांना लागू होणार नाहीत, असे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या