🌟परभणी जिल्ह्यातील लोकप्रिय लोकनेते विजय वाकोडे यांना नामांतर योद्धा पुरस्कार जाहीर....!


🌟लोकनेते विजय वाकोडे यांना २० जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार पुरस्कार🌟 

परभणी (दि.०१ जानेवारी) : मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळावे म्हणून तब्बल सतरा वर्षे चाललेल्या संघर्षात सहभागी नामांतर आंदोलकाला धम्म मैत्री समाज अभियानाच्या वतीने दरवर्षी नामांतर योद्धा म्हणून सन्मानित करण्यात येते.

यावर्षी सन २०२४ चा नामांतर योद्धा हा पुरस्कार परभणी जिल्ह्यातील लोकप्रिय लोकनेते विजय वाकोडे यांना जाहीर करण्यात आला आहे येत्या २० जानेवारी २०२४ रोजी धम्म मैत्री संवाद अभियानाच्या वतीने भीमा कोरेगाव विजयशौर्य दिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या निमित्ताने होणार्‍या शौर्य प्रेरणा अभिवादन सोहळ्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या