🌟पुर्णेतील नामांकित अभिनव विद्या विहार प्रशालेतील कलाशिक्षक गोविंद शिंदे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट कलाध्यापक पुरस्कार...!


🌟गोविंद शिंदेंच्या कलाक्षेत्रातील योगदानाची दखल घेत महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाने त्यांना हा पुरस्कार दिला🌟 

 पू्र्णा (दि.२० जानेवारी) - पुर्णा शहरातील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या अभिनव विद्याविहार प्रशालेत कार्यरत कलाशिक्षक तथा ज्येष्ठ चित्रकार गोविंद शिंदे यांना नुकताच राज्यस्तरीय उत्कृष्ट कलाध्यापक पुरस्कार पालघर येथे प्रदान करण्यात आला. 

          येथील अभिनव विद्या विहार प्रशाला या शाळेचे कलाध्यापक गोविंद शिंदे यांचे कलाक्षेत्रातील योगदानाची दखल महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ यांनी घेत त्यांना या वर्षीचा उत्कृष्ट कलाध्यापक हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला होता. हा पुरस्कार पालघर येथे आयोजित महामंडळाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात प्रदान करण्यात आला. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष नरेंद्र बारई, पी.आर.पाटील, दिगंबर बेंडाळे, बलराम सावंत, विजयसिंह ठाकूर, प्रकाश पाटील, हिरामण पाटील, प्रियवंदा तांबटकर, ज्योत्स्ना पाटील, माधव घयाळ यांच्या हस्ते गोविंद शिंदे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल   गोविंद शिंदे यांचे अभिनंदन कलाध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष केशव लगड, माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गरुड, जगदीश जोगदंड, दिलीप सोनकवडे, उद्धव पांचाळ, सुदाम बैकरे, विष्णू दुधाटे, अतुल सामाले यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या