🌟सहकारी संघ व खाजगी दुग्ध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना.....!


🌟गाय दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन🌟

परभणी (दि.25 जानेवारी) : राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी दुध खरेदी दराच्या चढ उतारामुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीत दुध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या अनुषंगाने राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघ खाजगी प्रकल्प यांना गाय दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादकांना प्रति लिटर रुपये 5 अनुदान देण्याची योजना दि. 11 जानेवारी, 2024 ते 10 फेब्रुवारी, 2024 या कालावधीसाठी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागामार्फत संयुक्तरित्या राबविण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने संबंधीत संघ व खाजगी प्रकल्प यांनी 3.5 फॅट / 8.5 एस.एन.एफ. या गुणप्रतिच्या दुधासाठी प्रति लिटर 27 रुपये दर देणे आवश्यक असून कमीत कमी 3.2 फॅट / 8.3 एस.एन.एफ. पर्यतच्या दुधासाठी अनुदान योजना लागु असणार आहे. 3.5/8.5 या गुणप्रतिपेक्षा कमी/जास्त होणाऱ्या फॅट व एस.एन.एफ. साठी प्रत्येकी 30 पैसे वाढ/ वजावट करणे आवश्यक आहे.

सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष सॉफटवेअर तयार करण्यात आले असून अनुदान पात्र गाय दुधासाठीचे प्रति लिटर रुपये 5 अनुदान दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डिबीटीव्दारे जमा करण्यात येणार आहेत. यासाठी दुध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते, आधारकार्ड व इयर टॅगशी जोडलेले असणे तसेच त्याची INAPH/भारत पशुधन पोर्टल वर नोंदणी आवश्यक आहे. शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर विभागातील सहकारी दुध उत्पादक संघ व खाजगी प्रकल्प, शितकरण केंद्रे आणि फॉर्मर प्रोड्युसर कंपनी यांना योजनेत सहभागी होण्याकरिता अर्ज सादर करता येतील. त्याप्रमाणे प्राप्त अर्जाची तपासणी करुन खालील तक्त्यात दर्शविल्यानुसार अर्ज पात्र ठरविण्यात आले आहे.

शासनाच्या 5 रुपये अनुदान योजनेपासून छत्रपती संभाजीनगर विभागातील सहकारी संघ व खाजगी दुग्ध प्रकल्पांना दुध पुरवठा करणारे एकही दुध उत्पादक शेतकरी वंचित राहू नये. यासाठी सर्व दुध उत्पादक शेतक-यांनी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाशी संपर्क साधावा. तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत छत्रपती संभाजीनगर विभागातील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या गाय/ म्हैस यांचे इयर टॅगींग करण्याची मोहीम राबविण्यात येत असून त्यासाठी सर्व दुध उत्पादक शेतकरी यांनी आपापल्या जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा. याव्दारे सहकारी संघ व खाजगी दुग्ध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादकांनी प्रकल्पांना आवश्यक माहिती देवून आपल्या जनावरांचे टॅगींग करुन घेवून शासनाच्या सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या