🌟झिरो आर्थिक भांडवलावर अशोक कुल्थे यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासून विश्वासूपणाच्या भांडवलाला सिद्ध केले🌟
(०६ जानेवारी २०२४ रोजी शहिद सरदार उधमसिंघ फाउंडेशन महाराष्ट्रच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात आपल्या स्वकर्तृत्वाने स्वतःचे वर्चस्व निर्माण करणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वांचा 'समाज भुषण' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्यातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे व्यापार क्षेत्रातील 'समाज भुषण' श्री अशोकराव कुल्थे)
लेखक - चौधरी दिनेश (रणजित)
पुर्णा शहरातील सोने/चांदी व्यापार क्षेत्रातील जेष्ठ व्यापारी तथा 'किरण ज्वेलर्स' या सुवर्ण दालनाचे मालक अशोकराव विश्वनाथराव कुल्थे या क्षेत्रातील एकमेव ब्रॅण्ड म्हणून ओळखले जातात त्यांच्यातील सचोटी प्रामाणिकपणा व स्वभावातील मृदूता या जोरावर त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी सुरू केलेला सोने/चांदीच्या कारागीरीसह सोने/चांदी व्यापाराचा व्यवसाय आज भरभराटीत आला आहे.
त्यांच्यातील चिकाटी व मेहनतीमुळे ते एक सोने/चांदी व्यवसायीक म्हणून या व्यापार पेठेतील चोवीस कॅरेट सोने अर्थात 'ब्रॅण्ड' ठरला आहेत.झिरो आर्थिक भांडवलावर व विश्वासूपणाच्या भांडवलाला त्यांनी सिद्ध केले स्वतः सुंदर दागिने घडवीत त्यांनी ग्राहकांची मन जिंकली दागिन्यांची शुध्दता व व्यवहारातील सचोटी हेच त्यांचे खरे भांडवल ठरले तसा हा त्यांचा पिढीजात व्यवसाय सोने/चांदी भावातील तेजी मंदीचा फटकाही वेळप्रसंगी त्यांनी संयमाने व सहचारिणी सौ.प्रेमलाताई यांच्या समर्थ साथीने सोसला.व्यवसायावरील त्यांचा प्रामाणिकपणा निष्ठाच त्यांना यशोशिखरावर घेऊन गेली.त्यांचे होतकरू चिरंजीव किरण कुल्थे यांनी या व्यवसायास अधिकची झळाळी दिली आजही वयाच्या ७५ व्या वर्षी अशोकराव कुल्थे अत्यंत कुशलतेने व्यवसाय सांभाळतात ही एक कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल ग्राहकांच्या सुख दुःखात सहभागी होत त्यांनी त्यांच्या सोबत सलोख्याचे व कौटुंबिक ऋणानुबंध निर्माण केले त्यांच्या मधूर स्वभावाने व 'किरण ज्वेलर्स' या प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुर्णा येथील बाजारपेठ समृद्ध केलीत.येथील व्यवसाय क्षेत्रात त्यांनी एक आदर्श निर्माण केला त्यांच्या उद्योगासह त्यांच्या कर्तृत्वाचा तमाम पुर्णेकरांना अभिमान वाटतो त्यांच्या व्यवसायास दैनिक क्रातिशस्त्र व शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्र परिवाराच्या शतशः हार्दिक शुभेच्छा...
टिप - काही वाचकांच्या आग्रहास्तव लेखाला पुन्हा प्रसिध्दी
0 टिप्पण्या