🌟पाथरी तालुक्यातील बाभळगाव मंडळासह वाघाळा परिसरातील रब्बी पिके पाण्या अभावी संकटात.....!


🌟पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचे पिकही करपू लागले ; गाव तलावाला ही पडली कोरड🌟


पाथरी :- गत हंगामात वरुन राजाची अवकृपा झाल्याने या वर्षी खरीपात दोन वेळा पेरणी करून ही पावसा अभावी उत्पान खर्च ही निघाला नाही. रब्बी पेरणी नोव्हेंबरच्या शेवटी झालेल्या पावसावर झाली. आता बाभळगाव मंडळा सह पाथरी मंडळातील वाघाळा आणि परिसरातील ज्वारी सह हरभरा पिके ही पाण्या अभावी करपु लागली आहेत तर पाऊस मान कमी झाल्याने अनेक विहिरी, कुपनलिका कोरड्या पडल्या असून गाव तलाव ही कोरडा झाल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट गंभिर होत चालले आहे.


मागिल तीन चार वर्ष मनसोक्त बरसलेला वरुन राजा या वेळी चांगलाच डोळे वटारुन बसला.त्या मुळे शेतक-यांचे प्रचंड नुकससान झाले, लहरी पणे बरसलेला वरुन राजा पाथरी तालुक्याच्या दक्षिण भागात अतिषय कमी प्रमाणात पडला ज्याची नोंद वार्षीक सरासरीच्या पंचविस टक्के पण नाही. खरीपात अनेक शेतक-यांनी दुबार पेरणी केल्या नंतर ही पिकां वर ट्रॅक्टरचा नांगर फिरवला होता. सप्टेबर मध्ये शेतक-यांनी मोठा संघर्ष करत जायकवाडीचे एक आवर्तन मिळवल्या ने आणि हलका पाऊस झाल्या मुळे जाड जमिनित एकरी जेमतेम दोन,तीन क्विटल सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन मिळाले. यातून शेतक-यांचा उत्पादन खर्च ही निघाला नसल्याचे शेतकरी सांगतात. वाघाळा गावासह बाभळगाव मंडळातील लोणी बु. कान्सूर,गौंडगाव,तारुगव्हाण, बाबूलतार,सारोळा,लिंबा,विटा,मुदगल, डाकूपिंप्री, बनई, मानवत, टाकळगव्हाण ,  फुलारवाडी तालुक्यातील कुंभारी,वांगी या सह पंधरा ते विस गावात नोव्हेंबर महिण्यात जायकवाडीचे दुसरे आवर्तन दिले गेले होते या नंतर आवकाळी पावसाची कृपा झाल्याने या भागात डिसेंबर महिण्याच्या पहिल्या आठवड्यात रब्बी ज्वारी आणि हरभरा पेरणी झाली होती. आता ही जमिनीवर रांगणारी पिके पाण्या अभावी करपु लागली आहेत. या पिकांना जायकवाडीचे पाणी सद्यस्थितीत मिळाले तर चा-या सोबतच शेतक-यांना चावन्या साठी दाने मिळतील असे शेतकरी सांगत आहेत. पिकांना सद्यस्थितीत पाण्याची अत्यंत गरज असून प्रशासनाने वराती मागून घोडे आणन्याचा प्रकार करू नये अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. ७ जानेवारी रोजी औरंगाबाद येथे पालकमंत्री ना संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत रब्बी साठी दोन पाणी पाळी देण्याची घोषणा ही झाली तसे माध्यमात वृत्त ही आले. तत्पुर्वी २० नोव्हेंबर ला पाणी पाळी देणार असल्याचे परिपत्रक ही जायकवाडी पाटबंधारे विभागाने प्रसिद्द केले होते. मात्र अद्यापही जायकवाडीचे पाणी मिळत नसल्याने पिके आता करपू लागल्याचे चित्र वरील सर्व गाव शिवारात दिसत आहे.भटकत आलेल्या शेळ्या,मेंढ्यांच्या कळपासह शिवारात पिण्याला पाणी नसल्याने जनावरांचे मोठे हाल होताना दिसत आहेत,गाव तलावांनी तळ गाठलाय तर शेतशिवारातील विहिरी आणि कुपनलीका कोरड्या पडल्याने येणाऱ्या काळात पाण्याचे मोठे संकट या भागात उभे राहाण्याची चिन्हे दिसत आहेत. जायवाडी पाटबंधारे विभागाने आता तात्काळ एक पाणी पाळी आणि या नंतर किमान तीन पाळी पाळी दिल्यास चारा पिके आणि पिण्याच्या पाण्याचे संकट काही अंशी दुर होईल असे शेतकरी सांगत आहेत. जानेवारी महिण्यात मिळणा-या आवर्तनाचे पाणी बी ५९ चारीला तात्काळ सोडावे अशी मागणी शेतकरी करत आहेत. या चारीवर जवळपास विस गावचा शिवार अवलंबुन असल्याने तात्काळ पाणी सोडण्याची मागणी पुढे येत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या