🌟परभणी जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगारांसाठी राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत ‘मैत्री’ प्रशिक्षणांचे आयोजन....!


🌟याकरीता प्रशिक्षित व्यक्तिची कृत्रिम रेतन व अनुषंगीक कार्य करण्यासाठी नियुक्ती करण्यात येणार🌟 

परभणी (दि.24 जानेवारी) : राज्यातील गायी-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाची व्याप्ती वाढविण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करणे. तसेच दुग्धउत्पादनात वाढ होवुन शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्रशासनाकडुन प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगारांसाठी राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत मैत्री म्हणून प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येणार आहे. याकरीता प्रशिक्षित व्यक्तिची कृत्रिम रेतन व अनुषंगीक कार्य करण्यासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. 

सदर प्रशिक्षण कार्यक्रम हा 3 महिने कालावधीचा असुन, यामध्ये 1 महिना क्लासरुम ट्रेनिंग व 2 महिने प्रॅक्टीकल ट्रेनिंगचा समावेश राहील. क्लासरुम ट्रेनिंग पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये आयोजीत करण्यात येईल. प्रॅक्टीकल ट्रेनिंग जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1  किंवा तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय किंवा जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय या ठिकाणी घेण्यात येईल.प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत असून, अर्जदार हा किमान 12 वी उत्तीर्ण झालेला असावा, त्याचे वय 18 ते 35 वर्ष असावे. अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये उपलब्ध होईल.

जिल्ह्याकरिता एकुण 136 उमेदवारांची सदर प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांचेकडे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.नेमाडे व जिल्हा परिषद जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.आघाव यांनी केले आहे.।।।।।

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या