🌟परभणी जिल्ह्यातील संधीसाधू राजकारण्यांच्या भाऊगर्दीत हरपलेला ग्रामीण भागातील एक निस्वार्थ सुर्यवंशी 'माणिक'....!


🌟प्रश्न शेतकऱ्यांच्या हिताचे असो की सर्वसामान्यांच्या हिताचे धाडसाने सामोरे जावून त्या प्रश्नांचा उलगडा करण्यात माणिक सुर्यवंशी तरबेज🌟


✍🏻व्यक्ती आणि व्यक्तीमत्व - चौधरी दिनेश (रणजित) पुर्णा

सामाजिक राजकीय क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याची धमक असलेल्या ग्रामीण भागातील युवकांचे नेतृत्व सर्वसामान्य जनता स्विकारत असली तरी राजकीय क्षेत्रातील संधीसाधू मात्र त्यांच्या राजकीय घौडदौडीला कुटील कारस्थान रचीत वेळोवेळी लगआमच लावण्याचा प्रयत्न करीत असतात असे म्हणणे यत्किंचितही चुकीचे ठरणार नाही.परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातल्या मौजे निळा या गोदावरी काठावरील पुनर्वसित गावातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील माणिक सुर्यवंशी या धाडसी युवकाने आपल्या सामाजिक/राजकीय वाटचालीची सुरुवात अखिल भारतीय छावा मराठा युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सन २००१ वर्षी केली तब्बल दहा वर्ष या सामाजिक संघटनेत कार्यरत राहून त्यांनी आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्व क्षमतेच्या बळावर अनेक आंदोलन गाजवली शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न असो की सर्वसामान्यांच्या हिताचे धाडसाने सामोरे जावून त्या प्रश्नांचा उलगडा करण्यात माणिक सुर्यवंशी तरबेज होते.


यानंतर सन २०१० यावर्षी शिवसेना उबाठा पक्षाच्या युवा सेनेत तत्कालीन आमदार सौ.मिराताई कल्याणराव रेंगे पाटील व जिल्हा प्रमुख श्रीनिवास रेंगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमतः युवा सेना पुर्णा तालुका प्रमुख व यानंतर २०१९ ते २०२२ या तिन वर्षे युवा सेना उपजिल्हा प्रमुख पदावर कार्यरत राहून माणिकराव सुर्यवंशी यांनी ग्रामीण भागात युवा सेना पोहचवण्यासाठी सातत्याने प्रमाणिक प्रयत्न केला.युवा सेनेत कार्यरत असतांना त्यांनी डिग्रस बंधाऱ्यातील पाणी पुर्णा-पालम तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना शेतीसह सर्वसामान्य जनतेला पिण्यासाठी उपलब्ध व्हावे याकरिता धानोरा काळे येथे भव्य 'रस्ता रोको' आंदोलन केले या आंदोलनाची नांदेड येथील विष्णूपुरी प्रकल्प प्रशासनासह तत्कालीन परभणी जिल्हाधिकारी महिवाल यांनी दखल घेऊन पाणीसाठा नांदेडला न सोडता पाणीसाठा पुर्णा/पालम तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवला यानंतर दि.०६ डिसेंबर २०१६ यावर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी महिवाल यांच्याकडे माणिकराव सुर्यवंशी यांनी लेखी स्वरूपात निवेदन देऊन धानोरा काळे येथील गोदावरी नदीपात्रावरील पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली या मागणीची देखील दाखल घेऊन प्रशासनाने नवीन पुलाच्या बांधकामासाठी मंजूरी देऊन २४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना भविष्यात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध  होणार आहे.


महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कापूस बोंड अळी अनुदान व संपूर्ण कर्जमाफीसाठी देखील माणिकराव सुर्यवंशी यांनी तुकाराम ढोणे यांच्या सोबत तालुक्यातील पांगरा शिवारात सरणावर बसून तब्बल पाच दिवस अन्न पाणी त्याग आंदोलन केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर,वसमत विधानसभेचे विद्यमान आमदार राजू भैय्या नवघरे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी माणिकराव सुर्यवंशी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांना पाठिंबा दर्शविला होता ग्रामीण भागातील अश्या या निस्वार्थ धाडसी युवा नेतृत्वाला पाठबळ देऊन त्यांना मोठं करण्याऐवजी त्यांच्याकडे प्रस्थापित राजकारण्यांनी दुर्लक्ष केल्याने परभणी जिल्ह्यातील संधीसाधू राजकारण्यांच्या भाऊगर्दीत हरपलेला ग्रामीण भागातील एक निस्वार्थ सुर्यवंशी कुटुंबातील अनमोल 'माणिक' राजकीय क्षेत्रातून दुर गेल्याचे निदर्शनास येत आहे.

परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील मौजे निळा या गोदाकाठावरील गावातील अल्पभूधारक शेतकरी भिमराव रामराम सुर्यवंशी व गंगाबाई भिमराव सुर्यवंशी यांच्या पोटी दि.११ जानेवारी १९७६ यावर्षी जन्मलेल्या माणिकराव सुर्यवंशी यांचा आज ४८ वा वाढदिवस असल्याने त्यांना शहिद सरदार उधमसिंघ फाउंडेशन महाराष्ट्र व जंग-ए-अजित न्युज हेडलाईन्स परिवाराकडून वाढदिवसासह पुढील राजकीय वाटचालीस देखील शतशः हार्दिक शुभेच्छा........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या