🌟पूर्णा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील लहाणे यांची सुरक्षा शाखेत बदली🌟
परभणी (दि.२४ जानेवारी) : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यातील पोलिस दलातील आठ पोलिस अधिकार्यांच्या जिल्हा पोलिस प्रशासनाने बदल्या केल्या आहेत.
त्याप्रमाणे पूर्णा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील लहाणे यांची सुरक्षा शाखेत, ग्रामीण पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल कुरुंदकर यांची एटीएसमध्ये, चारठाणा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक भानुदास गायकवाड यांची भरोसा सेलमध्ये, एटीएसमधील सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बोरकर यांची मानवत पोलिस ठाण्यात, पिंपळदरी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम हराळे यांची परभणी ग्रामीणमध्ये तर पालम येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश सूर्यवंशी यांची पिंपळदरी, मानवत येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रभाकर कापूरे यांची चारठाणा येथे तर बामणी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक कार्तिकेश्वर तूरनर यांची डायल 112 या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.....
0 टिप्पण्या