🌟आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे यांचा परभणी जिल्हा दौरा....!


🌟अभियानातील पायाभूत सुविधांची आढावा बैठक घेणार🌟

परभणी (दि.10 जानेवारी) : आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे हे गुरुवार, दि. 11 जानेवारी, 2024 रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दि.11 जानेवारी, 2024 रोजी सकाळी 10.30 ते 12.00 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या योजनांचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा-2024 अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आयुष्यमान भारत/ महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभूत सुविधांची आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी 12.00 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत दुपारी 12.30 वाजता परभणी येथून शासकीय वाहनाने हिंगोली कडे प्रयाण करतील......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या