🌟परभणी येथील डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशनच्या वतीने प्रमोद अंभोरे यांचा सत्कार....!


🌟शहरातील इंदिरा गांधी नगर परसावत नगर रोड येथील एस.के.कोचिंग क्लासेस येथे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार🌟


परभणी (दि.१५ जानेवारी) परभणी शहरातील विद्यार्थी मित्र  प्राध्यापक रफिक शेख  सरांचे  डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन या शैक्षणिक संस्थेच्या वतीने  प्रमोद अंभोरे यांना दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी वीर वारकरी  सेवा संघ प्रणित राष्ट्रचंद फाउंडेशनचा प्रभावती नगरी गौरव पुरस्कार  2024 अंतर्गत  "स्वामी विवेकानंद युवा सेवा रत्न पुरस्कार 2024"  हा पुरस्कार मिळाल्याने प्रमोद अंभोरे यांचा  दिनांक 13 जानेवारी  2024 रोजी शहरातील इंदिरा गांधी नगर परसावत नगर रोड  येथील एस के कोचिंग क्लासेस येथे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून सन्मान करण्यात आला आहे. प्रमोद अंभोरे हे गेल्या काही वर्षापासून  समाजहित अभियान प्रतिष्ठान, दयावान सरकार महाराष्ट्र राज्य, माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी, लोक स्वतंत्र पत्रकार महासंघ, समाजहित न्यूज या विविध सामाजिक संघटना व पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांना  न्याय देण्याचे काम  तसेच गोरगरीब गरजू लोकांना  मदत करण्याचे काम करत असतात. त्याच अनुषंगाने  त्यांच्या या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व पत्रकारिता च्या निस्वार्थ कार्याची दखल घेऊन  त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार मिळाल्याने प्रमोद अंभोरे यांचा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन  च्या वतीने  संचालक विद्यार्थी मित्र  प्राध्यापक रफिक शेख  व एस के कोचिंग क्लासेस च्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी च्या वतीने स्वागत करून  सन्मान करून  पुढील कार्याच्या शुभेच्छा देण्यात आले आहेत. त्याचबरोबर  रुग्णहक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष  दिलीप बनकर , जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज, भीमा कोरेगाव मित्रमंडळाचे अध्यक्ष  संदीप वायवळ  यांचाही  विद्यार्थी मित्र प्राध्यापक रफिक शेख  यांच्या वतीने यथोचित  सन्मान करण्यात आला आहे. हा सन्मान केल्याबद्दल  प्रमोद अंभोरे यांनी  डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन  चे व एस के कोचिंग क्लासेस च्या विद्यार्थ्यांचे  आभार मानले आहे. यावेळी संचालक  विद्यार्थी मित्र प्राध्यापक रफिक शेख, रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर, उपाध्यक्ष शेख सरफराज, भीमा कोरेगाव मित्रमंडळाचे  अध्यक्ष संदीप वायवळ सत्कारमूर्ती  प्रमोद अंभोरे व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या