🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची बैठक संपन्न.....!


🌟या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे हे होते🌟    


  
परभणी (दि.१० जानेवारी) - परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नुकतीच बैठक संपन्न झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. मेघनाताई बोर्डीकर,सौ.तृप्तीताई वरपूडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 सकल मराठा युवकांसाठी उद्योग करण्यासाठी व शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी ट्रॅक्टर या यंत्राची खूप आवश्यकता असते मागील काही दिवसापूर्वी ट्रॅक्टर या यंत्राचा व्याज परतावा मिळत नव्हता आता ते व्याज परतावा शेतकऱ्यांसाठी सुरू झालेला आहे तरी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर या योजनेचा लाभ घ्यावा व विविध विषयावर चर्चा केली यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला . यावेळी या कार्यक्रमास परभणी जिल्ह्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या