🌟जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना...!


🌟परभणी जिल्ह्यातील नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन🌟

परभणी (दि.03 जानेवारी) :  महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळा अंतर्गत राज्यातील गुरव व विरशैव लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकास व आर्थिक उन्नतीसाठी जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना शासनाने केली आहे. या दोन्ही महामंडळाचे कामकाज हे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाअंतर्गत कार्यान्वित करण्यात आले आहे. महामंडळाच्या या योजनेचा लाभ जास्तीत जास्त गुरव व विरशैव लिंगायत समाजाच्या लोकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस.एन. झुंजारे यांनी केले आहे.

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या