🌟‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात सर्व शाळांनी सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


🌟शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभागासाठी 40 गुण देण्यात येणार🌟

परभणी (दि.11 जानेवारी) : राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे स्पर्धात्मक अभियान राबविण्यात येत असून, या अभियानात जिल्ह्यातील सर्व शाळांनी सहभागी व्हावे असे अवहान जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

  राज्यातील सर्व शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा आणि आनंददायी व प्रेरणादायी वातावरण तयार व्हावे, यासाठी या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.हे अभियान 1 जानेवारी, 2024 पासून 45 दिवस राबविले जाणार आहे. यात शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व उर्वरीत इतर व्यवस्थापनाच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात आल्या आहेत. दोन्ही गटासाठी तालूका, जिल्हा व राज्यस्तर बक्षीसे दिली जाणार आहे. या अभियानातील शाळांसाठी विद्यार्थी केंद्रित उपक्रम, शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम यासाठी एकूण 100 गुणांचे मुल्यमापन होणार आहे. अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांना विद्यार्थी केंद्रित उपक्रमांच्या आयोजनासाठी 60 गुण असणार आहेत. यात शाळा व परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी 10 गुण, विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमातील, व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभागासाठी 15 गुण, शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक उपक्रमांसाठी 10 गुण, शाळेची इमारत व परिसराची स्वच्छतेसाठी 10 गुण, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्यासाठीच्या उपक्रमास 5 गुण देण्यात येणार आहे.

शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभागासाठी 40 गुण देण्यात येणार आहे. यात आरोग्यसाठी 15 गुण, आर्थिसक साक्षरता व कोशल्य विकासा 10 गुण, शाळा देणगी व शाळा व्यवस्थापन समितीचे कामकाज 5 गुण, तंबाखू, प्लास्टीक मुक्त शाळा 5 गुण आणि विद्यार्थी केंद्रीत उपक्रम 5 गुण  अशाप्रकारे गुण असणार आहेत.  या स्पर्धेत तालूकास्तरीयसाठी पहिले 1 लाख दूसरे 2 लाख तर तिसरे 1 लाख बक्षिसे असणार आहे. तर जिल्हास्तरीयसाठी पहिले 11 दूसरे 5 आणि तिसरे 3 लाख असेल. विभागस्तरीयसाठी पहिले 21 लाख, दुसरे 11 लाख, तिसरे 7 लाख मिळेल. तर राज्यस्तरावरील शाळासाठी पहिले पारितोषिक 51 लाख असून दुसरे पारितोषिक 21 लाख आणि तिसरे 11 लाखांचे असेल.

सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना या अभियानात समावेश होण्याची संधी आहे. असून जिल्ह्यातील सर्व शांळानी यात सहभागी व्हावे असे अवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या