🌟नांदेड येथील पवित्र सचखंड गुरुद्वाराचे संत बाबा कुलवंतसिंघजी यांचे जत्थेदार पदावर चोवीस वर्षाची सेवापूर्ति....!

 


🌟जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी यांचे 25 व्या वर्षात पदार्पण🌟

✍🏻स.रविंद्रसिंघ मोदी-नांदेड

शीख (सिख) धर्मियांच्या पाच तखतापैकी एक महत्वाचे तखत म्हणून सुप्रसिद्ध असणारे तखत सचखंड श्री हजुरसाहिब नांदेड येथे मुख्य जत्थेदार म्हणून वर्तमान जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी यांनी चोवीस वर्षाची सेवा पूर्ण केली आहे. तसेच दि. 13 जानेवारी 2024 रोजी त्यांचा सेवापर्व पंचवीसाव्या वर्षात पदार्पित होणार आहे.

संत बाबा कुलवंतसिंघजी यांनी दि. 13 जानेवारी 2000 रोजी पहिल्यांदा मुख्य जत्थेदार म्हणून तखत सचखंड श्री हजुर अबचल नगर साहेब येथे मुख्य सेवेत पदार्पण केले होते. त्यांच्या पूर्वीचे जत्थेदार संत बाबा हजुरासिंघजी धूपिया यांनी इहलोक यात्रा संपवल्यामुळे संत बाबा कुलवंतसिंघजी यांना सेवेत पाचरण करण्यात आले होते. संत बाबा हजुरासिंघजी यांनी जत्थेदार पदावर सोळा वर्षें सेवा पूर्ण केली होती. त्यांचा वारसा संत बाबा कुलवंतसिंघजी यांनी योग्यरीतिया संभाळला म्हंटल्यास वावगं होणार नाही.

संत बाबा कुलवंतसिंघजी यांचे बालपण खूपच प्रतिकूल परिस्थितीत गेला. लहान असतांनाच वडिलांचे छत्र त्यांनी हरवले. दोन मोठे भाऊ आणि कनिष्ठ बंधु सोबतीला होती. बाबाजी आय.टी.आय पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सोबतच धार्मिक शिक्षा आत्मसात केली. विद्यार्थी दशेत कडे कोरण्याचे काम सुद्धा केले. म्हणूनच त्यांचे कुटुंब कडेवाले कुटुंब म्हणून ओळखले जाते. दि. 1 एप्रिल 1995 रोजी त्यांनी तखत सचखंड हजुरसाहिब गुरुद्वारा येथे मीत ग्रंथी (पंज प्यारे) म्हणून सेवा आरम्भ केली. नंतर त्यांनी विविध सेवेत आपले योगदान दिले. सन 2000 मध्ये त्यांनी मुख्य जत्थेदार म्हणून सेवा सुरु केली. तखत सचखंड हजुरसाहिब येथे बाबाजींनी जवळपास 30 वर्षें पूजा-अर्चना सेवा पूर्ण केली आहे.

नांदेड येथील गुरुद्वाराच्या जत्थेदार पदावर सेवा करण्यासाठी व्यक्तिला ब्राह्मचार्य पाळावे लागते. संपूर्ण आयुष्य भक्ती आणि धार्मिक विधींचे संचालन करण्यात वाहुन जाते. सोबतच सामाजिक कार्यक्रमात, समाजाच्या सुखदुःखात समाविष्ट व्हावे लागते. बाबाजींना सेवेची पराकाष्ठा जापावी लागते. संत बाबा कुलवंतसिंघजी हे तसे नशीबवान ठरले कारण त्यांच्या सेवा कार्यकाळात नांदेडला श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचा सन 2008 मध्ये त्रिशताब्दी सोहळा भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. त्यावेळी संपूर्ण सिख जगताचे लक्ष्य हजुरसाहिब वर केंद्रित झाले होते.

दूसरीकडे वर्ष 2020 चा कोविड संक्रमण काळ देखील आठवतो. त्या परिस्थितीत देखील संत बाबा कुलवंतसिंघजीनी आपली सेवा पूर्ण चोख बजावण्याचे प्रयत्न केले. अनेक अडचणी आल्या. समस्त वेदना, दुःख अंगीकार केले आणि आपली पूजा - अर्चना पूर्ण केली. त्यांच्या नशिबी दीर्घसेवा आली आहे. हजुरसाहिब नांदेड येथे त्यांच्या रूपात जत्थेदार पदाचे एक इतिहासच घडत आहे. बाबाजींना समस्त नांदेडकरांच्यावतीने हार्दिक शुभेच्छा.


स. रविंद्रसिंघ मोदी, पत्रकार

नांदेड 9420654574

........

फोटो : संत बाबा कुलवंतसिंघजी (जत्थेदार साहिब)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या