🌟नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर कार्यालयात करतात.. महापुरुषांना मानवंदना...!


🌟या कार्यक्रमांच्या माध्यमातून खासदार साहेबांचे जन्मभूमीवर असलेले प्रेम आणि राष्ट्रभक्ती दिसून येते🌟

✍🏻लेखक : सुनिल रामदासी नांदेड 

                खासदार म्हटले की, लोकसभेच्या आपल्या कार्यक्षेत्रातील लोकांची मोठी वर्दळ आपल्याकडे येत असते. या सर्वांशी संवाद साधण्यासाठी साहेबांनी नांदेड येथे भव्य असे संपर्क कार्यालय निर्माण केले आहे. आणि या संपर्क कार्यालयामध्ये लोकांशी संवाद साधण्याबरोबरच थोर महात्मे राष्ट्रपुरुषांना जयंती आणि त्यांच्या पुण्य स्मरणानिमित्त मानवंदना आणि आदरांजली वाहण्यात  येते. या कार्यक्रमांच्या माध्यमातून साहेबांचे जन्मभूमीवर असलेले प्रेम आणि राष्ट्रभक्ती दिसून येते.

जननी आणि जन्मभूमी या स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असतात असा विचार आपल्या भारतीय संस्कृतीने मांडला. ज्या देशाच्या मातीत आपला जन्म झाला, ज्या देशातील नद्या आपली तहान भागवतात, जी काळी माय आपल्याला अन्नधान्य देते त्या - आपल्या जन्मभूमीवर जिवापाड प्रेम करणे, आपल्या देशाचे संरक्षण करणे म्हणजेच खरी देशभक्ती होय. आपला भारत देश प्राचीन राष्ट्र या देशाच्या विविध कालखंडात परकीयांनी या भूमीवर आक्रमण केले आणि या भूमीला त्या वेळी गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे, मुघलांच्या जुलमी अत्याचारातून अन्यायातून या महाराष्ट्र भूमीला मुक्त करणारे  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रत्येक कार्यात आपणास देशभक्ती आणि राष्ट्रप्रेम दिसते.   स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमान निकोबारच्या कारागृहात जो अन्याय सहन केला अनेक दिवस उपाशी तापाशी राहून आपल्या भारत मातेला मुक्त करण्याच्या उद्देशाने जुलूम सहन केला त्यात देशभक्ती हाच भाव होता.

देशभक्ती म्हणजे एखाद्याचे आपल्या देशावर असलेले प्रेम देशभक्ती गोष्ट अशी आहे जी देशातील नागरिकांना त्यांच्या देशासाठी निस्वार्थपणे काम करण्यास आणि देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यास प्रवृत्त करते. खऱ्या अर्थाने कोणताही संपूर्ण विकास असेल नेहमीच खऱ्या देशभक्तांनी भरलेला दिसतो, देशभक्ती म्हणजे आधी देशाचे हीत दिसून येते शिवाय ते राष्ट्र मजबूत करण्यास मदत करते. आणि म्हणूनच देशभक्तीची भावना समाजामध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये वृद्धिंगत होण्याचे काम अप्रत्यक्षपणे साहेब या माध्यमातून करताना दिसतात.


                  आपल्या देशात जन्मलेला प्रत्येक जण आपल्या देशाला आई मानत असतो. इथे मोठा होतो, इथे शिक्षण घेतो, इथे नोकरी करत आपले जीवन जगत असतो, असा नागरिक आपल्या देशाला आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी मानतो. देशभक्ती ही व्यापक भावना आहे देशभक्तीची भावना सर्वत्र असते या भावनेतूनच माणसांमध्ये  त्याग आणि सहकार्याची भावना जागृत होते. माणूस मातृभूमीला वैभवशाली आणि पूजनीय मानतो. तो आपल्या देशाला कधी संकटात पाहू शकत नाही. प्रसंगी देशाच्या रक्षणासाठी देशभक्त हसत खेळत आपले तन मन आणि संपत्ती अर्पण करतो आणि वेळ आली तर स्वतःच्या जीवाची परवा सुद्धा करत नाही. छत्रपती शिवाजी महाराज. महाराणा प्रतापजी. महात्मा गांधी, नेताजी सुभाष चंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग चंद्रशेखर आझाद. यासारखे अनेक देशभक्ती येथे जन्माला आले. ज्यांनी इंग्रजांपासून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. आजच्या युवकात देश प्रेमाची भावना खूप महत्त्वाची आहे पण त्याचा मार्ग अवघड आहे देशाच्या प्रेमापोटी प्रसंगी आपल्या प्राणाचे बलिदान सुद्धा द्यावे लागते, अशा देशभक्तांची नेहमीच आठवण काढण्यासाठी आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी खासदार साहेबांनी राष्ट्रपुरुषांच्या जयंती आणि पुण्यस्मरण साजरे करून एक अनोखा पायंडा आपल्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला आहे......

लेखक : सुनिल रामदासी

पत्रकार नांदेड 

9423136441

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या