🌟नांदेड जिल्ह्यातील राजकीय/सामाजिक/व्यापार क्षेत्रातील लोभस व्यक्तिमत्त्व जेष्ठ समाजसेवक सरदार लड्डूसिंघ महाजन...!


🌟नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील धार्मिक,सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांची विशेष ओळख आहे🌟

(०६ जानेवारी २०२४ रोजी शहिद सरदार उधमसिंघ फाउंडेशन महाराष्ट्रच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात आपल्या स्वकर्तृत्वाने स्वतःचे वर्चस्व निर्माण करणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वांचा 'समाज भुषण' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्यातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे सामाजिक क्षेत्रातील जेष्ठ 'समाज भुषण' सरदार हरमीतसिंघ उर्फ लड्डूसिंघजी महाजन नांदेड)

'मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक क्षेत्रातील समाज भुषण हा सर्वोच्च पुरस्कार स्विकारताना श्री सरदार हरमीतसिंघ उर्फ लड्डूसिंघजी महाजन'

लेखक - चौधरी दिनेश (रणजित)

नांदेड जिल्ह्यातील सामाजिक/राजकीय/व्यापार क्षेत्रातील धाडसी व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून सरदार हरमीतसिंघ उर्फ ​​लड्डूसिंघ यांनी स्वकर्तृत्वाने आपले वर्चस्व निर्माण केले नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील धार्मिक,सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांची विशेष ओळख आहे.  त्यांच्या अगणित आणि उल्लेखनीय कामांचा प्रभाव राष्ट्रीय स्तरावर राहिला आहे. 

नांदेड येथील पवित्र तिर्थक्षेत्र सचखंड श्री हुजूर साहीब गुरुद्वारा बोर्ड या सर्वोच्च धार्मिक संस्थेचे सरदार हरमीतसिंघ उर्फ लड्डूसिंघ महाजन यांनी तब्बल दोन वेळेस प्रमुख म्हणून यशस्वीपणे काम केले आणि गुरुद्वारा प्रशासकीय समितीमध्ये वारंवार प्रतिनिधित्व देखील केले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत विकासात्मक उपक्रमांचे यशस्वी व्यवस्थापन केले.  नांदेड येथे सन २००८ यावर्षी साजऱ्या झालेल्या श्री गुरु ग्रंथ साहिबजी त्रिशताब्दी सोहळ्याच्या तयारीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पूर्वतयारी समितीचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. त्यांच्या अगणित कार्यांचे स्मरण करून ते अतुलनीय कार्य सर्वसामान्यांसमोर मांडण्यासाठी त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य अमृत महोत्सवी वाढदिवस संमेलन नांदेड शहरातील अबचल नगरमध्ये मोठ्या थाटात संपन्न झाले.शहीद सरदार उधमसिंघजी फाऊंडेशन, महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने त्यांनी ५० वर्षांहून अधिक काळ विविध क्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ सेवेची दखल घेऊन त्यांना दि.०६ जानेवारी रोजी दर्पण दिनाचे औचित्य साधून गौरवण्यात येणार आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस दैनिक क्रांतीशस्त्र व शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्र परिवाराच्या वतीने शतशः हार्दिक शुभेच्छा.....

टिप - काही वाचकांच्या आग्रहास्तव लेखाला पुन्हा प्रसिध्दी 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या