🌟धम्म कार्याला समर्पित भावनेने वाहून घेतलेल आदर्श व्यक्तिमत्व ग्यानोजी जोंधळे....!


🌟दिवंगत ग्यानोजी मरिबा जोंधळे यांचा आज १५ वा स्मुर्ती दिन🌟

✍🏻लेखक - श्रीकांत हि वाळे सर

माणूस किती दिवस जगला या पेक्षा तो कसा जगला कोणत्या विचारावर जगला या बाबीला अनन्य साधारण महत्व आहे. त्यांच्या निधनाला पंधरा वर्षाचा प्रदीर्घ कालावधी उलटूनही आजही त्यांच्या स्मृतीचा सुगंध दरवळताना दिसत आहे.भारतीय रेल्वेमध्ये पाच दशक कर्तव्यदक्षपने त्यांनी सेवा केली नौकरीचा बराचसा कालावधी त्यांचा पूर्णा या ठिकाणी गेला पूर्णा शहर आंबेडकर व धम्म चळवळीच मराठवाड्यामधील प्रमुख केंद्र बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर माई साहेबांना 14 ऑक्टोबर 1956 नागपूर या ठिकाणी अशोका विजयादशमी दिनी बुद्ध धम्माची दीक्षा देणारे पूज्य भदंत चंद्रमणी महास्थविर सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व डॉक्टर माई आंबेडकर यांनी त्यांचे हातून दीक्षा घेतली व त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पाच लाख अनुयायांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली.या दीक्षा समारंभाला पूर्णा शहरातील काही रेल्वे कर्मचारी गेले होते.

त्यापैकी एल. एस. साबणे वाय.जी. गायकवाड व इतर अनेक जण होते.त्यांच्या मनात अशी भावना निर्माण झाली नागपूर सारखा धम्मदीक्षा सोहळा पूर्णा शहरात व्हायला हवा.आणि त्यासाठी पूज्य भदंत चंद्रमणी महस्थविर यांना सन्मानपूर्वक पूर्णा शहरांमध्ये आणावं.धम्मदीक्षा सोहळा समारंभ आटोपून घरी आल्यानंतर त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित केली.आणि त्यांच्यासमोर हा विषय मांडला.सर्व सहमतीने  चंद्रमणी महस्थविर यांना सन्मानपूर्वक पूर्णा शहरामध्ये बोलावून त्यांच्या पवित्र हस्ते धम्मदीक्षेचा सोहळा पार पाडावा या दृष्टीने विचार विमर्श झाला.यामध्ये ग्यानोजी जोंधळे यांचा सक्रिय सहभाग होता.

तत्कालीन आंबेडकरी व धम्म चळवळीतील धाडसी व्यक्तिमत्व भारतीय बौद्ध महासभेचे तत्कालीन अध्यक्ष वाय.जी. गायकवाड ज्येष्ठ धम्म उपासक एल एस साबणे व धम्म चळवळीमध्ये कार्यरत असलेल्या इतर काही जण महामानव तथागत भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण स्थळ कुशीनगर या ठिकाणी पूज्य भदंत चंद्रमणी महास्त्वीर यांचं वास्तव्य होतं.त्या ठिकाणी पूर्णा येथील उपासक मंडळी गेली.पूज्य भंते ना विनम्र याचंना केली आपण महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील पूर्ण शहरांमध्ये यावं व नागपूर सारखा धम्मदीक्षा सोहळा आपल्या पावन हस्ते पार पाडावा.आम्हाला बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना च या सोहळ्यासाठी आमंत्रित करायचं होतं.

परंतु त्यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी अकाली महापरिनिर्वाण झालं आमची इच्छा ती अपूर्ण राहिली.सुरुवातीला पूज्य भंतेनी इतक्या दूर येण्यास असहमती दर्शवली.माझं वय खूप झाल आहे.प्रवासाची दगदग मला सहन होणार नाही.त्यावेळी वाय. जी. गायकवाड व एल.  एस. साबणे नम्रतापूर्वक म्हणाले आम्ही रेल्वेचे अधिकारी व  कर्मचारी आहोत रेल्वेने अगदी सुरक्षित आरामदायी प्रवासाची आम्ही हमी घेतो.तरीही पूज्य भंते तयार होईनात.शेवटी सर्वजण म्हणाले आम्हाला आपल्या विहारांमध्ये चीवर द्या आम्ही परत जाऊ शकत नाही.कारण पूर्णा वासियांना आम्ही अभिवचन दिले आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये पूज्य भंते चंद्रमणी महस्थविर यांना आम्ही सन्मानपूर्वक घेऊन येतो.

आमच्या विनंतीला मान देऊन ते येण्यासाठी तयार झाले.पूर्णा शहरातील दगडी चाळीच भव्य विस्तीर्ण मैदान या ठिकाणी 1958 मध्ये अतिशय भव्य दिव्य डोळ्याचे पारणे फिटणारा धम्मदीक्षा सोहळा पार पडला.रेल्वे ने भंतेजींचा आगमन झालं.सन्मानपूर्वक सजवलेल्याडोली मध्ये बसवून त्यांना धम्मदीक्षेच्या सुशोभित केलेल्या स्टेजवर विराजमान करण्यात आले. यामध्ये डोलीला खांदा देण्याचे काम ग्‍यानोजी जोंधळे यांनी केले.समता सैनिक दलाचे सैनिक म्हणून त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याला सेवा देण्याचं काम केलं.संपूर्ण मराठवाड्यांमधून मोठ्या प्रमाणावर दीक्षा घेण्यासाठी बौद्ध उपासक उपासिका आले होते.ग्यानोजी जोंधळे एक आदर्श संस्कारक्षम कुटुंब प्रमुख होते त्यांनी आपल्या सर्व मुलांना मुलींना त्या काळामध्ये उच्चशिक्षित केले.डॉक्टर इंजिनिअर बनवले.

त्यांचे जेष्ठ सुपुत्र विजयराव रेल्वेमधून ग्रेड वन लोको पायलट म्हणून सेवानिवृत्त झाले आहे.आंबेडकरी व धम्म विचाराला त्यांनी समर्पितपणे वाहून घेतले आहे.दुसरे सुपुत्र इंजिनीयर रमेश हेही सुद्धा सन्मार्गावर आरुढ आहेत.तिसरे सुपुत्र संजय हे बळीराजा साखर कारखाना या ठिकाणी सेवेत आहेत चौथे सुपुत्र डॉक्टर अशोक हे औरंगाबाद या ठिकाणी वैद्यकीय सेवा समर्पित भावनेने देत असतात.त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.संगीता ह्या संभाजीनगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान संचलित डॉक्टर हेडगेवार रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या संत वचनानुसार दिवंगत ग्यानोजी जोंधळे व त्यांच्या समर्पित सहचारिणी लक्ष्मीबाई यांनी आपला संपूर्ण कुटुंबावर चारित्र्य नीतिमत्ता व सदाचाराचे धडे दिले.

निर्वानस्थ पूज्य भंते उपाली थेरो व अखिल भारतीय भिख्खू संघाचे कार्याध्यक्ष डॉ.उपगुप्त महाथेरो यांचे विश्वासू श्रद्धा संपन्न उपासक उपासिका म्हणून या कुटुंबाकडे बघितल्या जाते.त्यांचे कनिष्ठ बंधू डॉ.वसंतराव हे महाराष्ट्र शासनाच्या पशू संवर्धन विभागातून उच्च पदस्थ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.ते व त्यांच्या सुविद्य पत्नी अमिता ताई पूर्णा या ठिकाणी पुण्यानुमोदन कार्यक्रमाला येत असतात.दरवर्षी नामांकित दैनिकात मध्ये विनम्र अभिवादनाची जाहिरात देत असतात.दिवंगत ग्यानोजी जोंधळे याचं जीवन आणि कार्य आंबेडकरी व धम्म चळवळीमध्ये कार्य करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या विचाराला कार्याला पावन स्मृतीला विनम्र अभिवादन .

अभी वादक

श्रीकांत हि वाळे सर

जिल्हा हिशोब तपासणीस

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा परभणी दक्षिण.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या