🌟पुर्णा तालुक्यातील माखणी येथील ओंकार गृहउद्योग समुहाच्या मालक मिराताई जनार्धन आवरगंड यांचा कौतुकास्पद उपक्रम.....!


🌟संक्रांतीच्या वाणामध्ये दिले वृक्षांचे रोपटे भेट🌟 


पुर्णा : पुर्णा तालुक्यातील माखणी येथील प्रगतशील महीला शेतकरी तथा ओंकार गृह उद्योग समुहाच्या मालक सौ.मिरा जनार्धन आवरगंड यांनी ओंकार गृह उद्योग संचलित शुध्द लाकडी तेल घाणा माखणी येथे मकर संक्रात निमित्ताने वाणामध्ये गावातील महीलांना तीळ गुळ देतांना एक दिर्घायुष्य आंबा,नारळाच्या वृक्षाचे रोपटे व आंबा लोणचे भेट दिले त्यासोबत ते रोपटे लावून त्याचे संगोपन करावयाचे पुढील वर्षी ते रोपटे किती मोठे होते त्याची काळजी कशा प्रकारे घेतली त्याबद्दल चर्चा केली जाईल त्यासोबत एक फोटो काढून आठवण म्हणून त्याचा आदर्श सर्वांनी घेतला तर वृक्ष लागवड संगोपन केले जाईल जेणे करून सर्वांनी लागवड केली तर काळजी घेणे सोपे जाईल असे मार्गदर्शन करण्यात आले . गावातील अनेक जबाबदारी स्वीकारली प्रसंगी गावातील महीला उपस्थित होत्या .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या