🌟परभणी येथे मानव मुक्ती मिशनची जिल्हास्तरीय बैठक संपन्न.....!


🌟या बैठकीस मानव मिशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन सावंत यांची प्रमुख उपस्थिती🌟 

परभणी : परभणी येथे आज बुधवार दि.१० जानेवारी २०२४ रोजी मानव मुक्ती मिशनच्या वतीने जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते दि.२९ जानेवारी रोजी २०२४ रोजी संदेशजी भंडारे परभणी दौऱ्यावर येणार आहेत. त्या संदर्भात त्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्या विषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली.

 त्याचबरोबर या बैठकीत राष्ट्रजागृती वारकरी परिषदेच्या परभणी जिल्हा प्रवक्ता पदावर ह. भ. प. कृष्णा महाराज राऊत शेंद्रेकर यांची निवड करण्यात आली. राष्ट्रजागृती वारकरी परिषदेचे परभणी जिल्हाध्यक्ष ह.भ.प.एकनाथ महाराज भालेराव यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्रक देण्यात आले.

या बैठकीस मानव मिशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन सावंत, मानव मुक्ती मिशनचे राज्यसचिव रामप्रसाद अंभोरे, मानव मुक्ती मिशनचे परभणी तालुकाध्यक्ष संतोष धोत्रे, पोलीस हक्क संरक्षण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोदअण्णा भोसले, भारत पवार वझुरकर, रामराजे बनसोडे,आदी उपस्थित होते.

यावेळी ह. भ. प. कृष्णा महाराज राऊत शेंद्रेकर यांच्या निवडीबद्दल सर्वांनी शुभेच्छा दिल्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या