🌟अनुदानित वसतिगृह कर्मचारी यांना वेतन श्रेणी लागू करण्यासंदर्भात सावली विश्राम गृह येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न...!


🌟वेतनश्रेणी शासनाने लागू करण्याबाबत या महत्त्वाच्या मुद्द्यावर  सकारात्मक बैठक संपन्न🌟

परभणी (दि.२३ जानेवारी) - जिल्हा परिषद परभणी समाजकल्याण विभागामार्फत चालत असलेल्या परभणी जिल्ह्यातील सर्व अनुदानित मुला-मुलींचे वसतिगृहातील कर्मचारी अधिक्षक, स्वयंकापी, चौकीदार व मदतनीस आदींना वेतन श्रेणी लागू कारण्या संदर्भात आज दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी शहरातील सावली शासकीय विश्राम गृह येथे महाराष्ट्र राज्य अनुदानित वस्तीग्रह कर्मचारी परभणी जिल्हा संघटनेचे  जिल्हा अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली  महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत  अनुदानित वस्तीग्रह कर्मचारी  जिल्हा परभणी यांच्या वेतनश्रेणी शासनाने लागू करण्याबाबत या महत्त्वाच्या मुद्द्यावर  सकारात्मक बैठक संपन्न झाली आहे.

या बैठकीला प्रमुख उपस्थित म्हणून विभागीय अध्यक्ष शिवासांभ माताळ, जिल्हा अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सचिव विजय बोरकर, चक्रवर्ती वाघमारे, प्रमोद अंभोरे, विश्वनाथ अंभोरे, सोमनाथ रोडे, अनुराधा साळवे , सुरेखा कोलाटे , महेश कुलकर्णी, मनिष प्रधान, मिलिंद खंदारे , राठोड, रमेश चव्हाण, बाळासाहेब गायकवाड,  बंडू जाधव केरवाडीकर, पांडुरंग निर्मले, अच्युत बेरलिंगे, बाबुलाल पवार, सुभाष हलकुडे, मेघानंद गोदाम, मसलेकर चारठाणकर, राजू काकडे, मनोज चव्हाण, शंकर जाधव, हनुमान नखाते, भारत मामा, बाबुराव माटे आदी वसतिगृह कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. या बैठकीस महाराष्ट्र राज्य वसतिगृह कर्मचारी प्रदेश कोर कमेटी पदाधिकारी मारोतराव कांबळे व शेख अय्युब यांनी कॉल कॉन्फरन्स द्वारा महत्वाचे मार्गदर्शन केले. या बैठकीचे संचलन विजय बोरकर यांनी केले तर  प्रास्ताविक शिवासांभ माताळ व प्रकाश चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद अंभोरे यांनी केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या