🌟परळी नगर परिषद,महसूल प्रशासन,वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने महास्वच्छता अभियान....!


🌟यावेळी मंदिराचा परिसर स्वच्छता अभियान राबविले गेला तसेच पाण्याने स्वच्छ धुऊन या परिसराची साफसफाई केली🌟


बिड/परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-   बिड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात दि.२० ते २२ जानेवारी दरम्यान देवस्थान व मंदिर परिसर महास्वच्छता व रोषणाई अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार परळी शहरातील बारा ज्योतिर्लिंग पैकी प्रभू वैद्यनाथ मंदिरात आज सकाळी महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी मंदिराचा परिसर स्वच्छता अभियान राबविले गेला तसेच पाण्याने स्वच्छ धुऊन या परिसराची साफसफाई केली. 


    जिल्ह्यातील सर्व प्रसिद्ध आणि मोठ्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी मंदिर व मंदिर परिसरात दिनांक २० ते २२ जानेवारी २०२४ या कालावधीत महास्वच्छता अभियान व रोषणाई करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. तसेच मंदिर परिसरात लोकसहभागातून प्लास्टिक सह इतर कचरा गोळा करून त्याचे व्यवस्थापन व मंदिराच्या आतील स्वच्छता तसेच मंदिरावरील रोषणाई करण्यात आली. मंदिराच्या बाहेरील परिसर लोक सहभागातून व श्रमदानातून करण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन व महा स्वच्छता अभियान राबवून नियमित प्लास्टिकसह इतर कच-यांचे व्यवस्थापन व मंदिर परिसरातील कचऱ्याचे वर्गीकरण त्यातील ओला व सुखा कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येत आहे. त्यांच अनुषंगाने जिल्हधिकारी यांच्या आदेशानुसार  परळी शहरातील बारा ज्योतिर्लिंग पैकी एक प्रभू वैद्यनाथ मंदिर तीर्थक्षेत्र व दक्षिणमुखी गणेश मंदिर, श्री संत जगमिञ नागा मंदिर,मोढा मार्केट श्री हनुमान मंदिर तसेच शहरात विविध भागात येथे नगर परिषद व महसूल प्रशासन, वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.मंदिर परिसरात स्वच्छता याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियानाप्रमाणेच महास्वच्छता अभियानानाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.  यावेळी  तहसीलदार व्यंकटेश मुंडे, परळी वैजनाथ नगर परिषदचे मुख्यधिकारी त्रिंबक कांबळे, उपमुख्यधिकारी संतोष रोडे, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, वैद्यनाथ देवस्थानचे राजेश देशमुख,स्वच्छता निरीक्षक शंकर साळवे, शहर समनव्यक सौ.स्नेहल घुबरे, व नगर परिषद येथील सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच तहसील प्रशासन व वैद्यनाथ देवस्थान विश्वस्त, भाविक व आदी उपस्थितीत होते.


* दि.१४ ते २१ जानेवारी दरम्यान स्वच्छ तीर्थ अभियान सुरु *

केंद्रीय ग्रहनिर्माण तथा शहर कार्य मंत्रालय भारत सरकारद्वारे परळी शहरातील विविध मंदिर व भागात दि.१४ ते २१ जानेवारी दरम्यान स्वच्छ तीर्थ अभियान राबविण्यात आले.  स्वच्छ तीर्थ संकल्पनेची प्रेरणा देत मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबवून प्रचंड प्रतिसाद मिळाला. मंदिर परिसर आणि मंदिराकडे जाणारे रस्ते याची सफाई नगर परिषद स्वच्छता विभागाच्या कर्मचारी व लोकसहभाग तसेच श्रमदानातून करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या