🌟तुम्ही बकळ शिंका, मोठं व्हा,आई वडीलाचं स्वप्न पूर्ण करा - सौ.वेणूताई खरडे


  🌟मौजे हसनापूर येथे आयोजित शिबिरात बोलतांना त्या म्हणाल्या🌟    

        शिक्षणाला राष्ट्रीय सेवा योजनाची जोड मिळाल्याने लोकजीवनात जाणिवेचे साम्राज्य निर्माण होत आहे. युवाशक्ती रासेयोचा आधारस्तंभ असून विधायक वळण लावणारे उर्जात्रोत होय.आम्हा हसनापूर वासियांना कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी राष्ट्रीय सेवा योजनेने एक नवविचार दिला. शिबीरार्थिनींनी आम्हाला लेकीची माया दिली असे मत हसनापूरचे पोलिस पाटील मदनराव खरडे यांनी व्यक्त केले.

        मौजे हसनापूर येथे आयोजित युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास विशेष युवती शिबीरात गावच्या विकासात माझं योगदान या विषयावर मदनराव खरडे, पंजाबराव खरडे, प्रकाशराव खरडे, शंकरराव कदम,सुभाषराव खरडे, सौ.वेणूताई खरडे,सौ.सरस्वतीताई, सौमित्राबाई खरडे,खरडे,सौ.शिवनंदाताईौऔ खरडे, सखुबाई खरडे या गावकऱ्यांनी आपली मतं मांडली.

      या शिबीरा तील मुलींना पाहून माझी मुलगी स्पर्धा परीक्षेच शिक्षण घेत आहे. मुलगा पुण्यात शिकला सध्या कंपनीत नोकरी करत आहे. आम्ही त्यांना पुर्ण शिक्षण दिलं. तुम्हीपण चांगलं बक्कळ शिका आई वडीलांच स्वप्न पूर्ण करा असा मौलिक सल्ला सौ.वेणूताई आनंदराव खरडे यांनी दिला मुलगी शिकली तर दोन्ही घर सुधरतील,गाव सुधरल.आमचे आई वडलान आमाला शाळतच घातलं नाही अशी खंत सौ.सरस्वतीताई खरडे यांनी मांडले.

            गावच्या विकासात उद्योगाची भर पडावी.लोक उद्योगी बनले तर प्रश्न मिटतील.हळूहळू का होईना मला सायकल वरुन मसाला विक्रीचा व्यवसाय सुरू करता आला आज तो टनानं विकला जात आहे.माझा शंकर मसाले उद्योग हसनापूरचे वैभव ठरत असल्याचे शंकरराव कदम यांनी सांगितले आमचं गाव स्वच्छ,सुंदर, विचारी आहे.गावात एकोपा आहे.शेतीत काबाडकष्ट करून आमचा उदरनिर्वाह सुरु आहे.मी रेशनच दुकान ही चालवतो.माझी मुलं उच्चशिक्षित बनली नोकरी करत असल्याचे समाधान प्रकाशराव खरडे यांनी व्यक्त केले.

           शिबीरामुळ आम्ही बोलायला शिकलो.जामकर साहेबांनी मुलीच्या शिक्षणासाठी कॉलेज काढल्यानं परिसरातील मुली शिकू शकल्या.गावविकासात शिक्षणाचं महत्त्व आम्हाला पटल्याचे पंजाबराव खरडे यांनी सांगितले राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. व्यासपीठावर बोलण्याचे धाडस आम्ही केलं .या शिबीराने आमच्यात आत्मविश्वास निर्माण केला ,असे मत हर्षदा शिंदे हिने मांडले.

           समाजसेवेचे धडे इथं मिळाले. ग्रामीण जीवनाची ओळख झाली.मला कंप्यूटर इंजिनियर व्हायचं.माझा गावची सेवा करायची असे मत आदिती बरवे हिने व्यक्त केले.रासेयो शिबीर माणूसपणाची जाणीव करून देते.समाजात सेवेची शिकवण देत.मी हे दुसरं शिबीर केल्याचे आरती बोधले हिने सांगितले हे शिबीर मला अनुभवता आलं. सुंदर व्यक्तिमत्व विकासासाठी शिबीराच महत्त्व पटल्याचे श्रध्दा नरवाडे हिने मत मांडले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या