परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक पदाचा पदभार आता रविंद्रसिंह परदेशी यांच्याकडे....!


🌟जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष महिला पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर यांना मुंबईच्या पोलीस उपायुक्त म्हणून पद़ोन्नती🌟


(परभणी जिल्ह्याचे नुतन जिल्हा पोलिस अधिक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी)

 परभणी (दि.०१ फेब्रुवारी) : लोकसभा निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या गृह खात्याने उच्चपदस्त पोलिस अधिकार्‍यांच्या काल बुधवार दि.३१ जानेवारी २०२४ रोजी मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या असून परभणीतील कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर.यांची मुंबईत पोलिस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली असून त्यांच्या रिक्त जागी चंद्रपूर येथून रविंद्रसिंह परदेशी यांची जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

        राज्याच्या गृह खात्याने मोठ्या प्रमाणावर केलेल्या बदल्यांमध्ये जवळपास ४२ अधिकार्‍यांचा समावेश आहे परभणी जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष महिला आयपीएस अधिकारी तथा पोलीस अधिक्षक रागसुधा आर यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक गंभीर प्रकरणांमध्ये अत्यंत कर्तव्यतत्परता दाखवून त्या प्रकरणांचा सखोल तपास करीत त्या प्रकरणांतील आरोपींना कालकोठडीची हवा दाखवल्याची एक नव्हे तर अनेक प्रकरणं आहेत अत्यंत कर्तव्यतत्पर/कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक म्हणून त्यांनी परभणी जिल्ह्यात आपली कारकीर्द यशस्वीपणे गाजवली त्यांच्या यशस्वी कारकिर्दीची दखल घेऊन शहिद सरदार उधमसिंघ फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने त्यांना दर्पण दिनाचे औचित्य साधून कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या