🌟पत्रकारांची सामाजिक राजकिय जीवनात अत्यंत म्हत्वाची भूमिका असून ते समाजाला दिशा देत असतात - ऋषिकेश सकनुर


🌟पुर्णा तालुक्यातील कळगाव वाडीत भाजपा तर्फे आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात ते बोलत होते 🌟

पुर्णा तालुक्यातील कळगाव वाडी येथे काल शुक्रवार दि.१२ जानेवारी २०२४ रोजी भाजप जिल्हा उपाध्यक्ष  ऋषिकेश सकनुर यांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधून "पत्रकार सन्मान सोहळा" आयोजित केला होता त्यात ते बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की पत्रकारांची सामाजिक राजकिय जीवनात अत्यंत म्हत्वाची भूमिका असून ते समाजाला दिशा देत असतात. पत्रकारांची लेखणी समाजामध्ये बदल घडवण्यासाठी सदैव कार्यरत असते. त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून समाजामध्ये अनेक सकारात्मक बदल होतात. समाजाचा आरसा म्हणजे पत्रकारिता आहे. असे त्यांनी प्रतिपादन केले.

यावेळी व्यासपीठावरती प्रमुख उपस्थिती म्हणून पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष श्री मदन आंबोरे श्री शिवाजी शिराळे संपादक धम्मपाल हनवते, लक्ष्मीकांत जवळेकर सुरेश मगरे होते कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष पंडित भोसले, प्रयोगशील शेतकरी गजानन आंबोरे,जनार्दना आवरगंड पत्रकार सुरेश मगरे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रगतशील शेतकरी गोविंद दुधाटे, लक्ष्मण सोनवणे, उद्धव भंडे ,ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग सकनूर,रामेश्वर सकनुर,अतुल भुसनर आदींची उपस्थिती होती..कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पांडुरंग सकनूर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजप कार्यकर्ते. भीमाशंकर शिराळे पांडुरंग मोरताटे शिवकुमार शिराळे आदींनी परिश्रम घेतले.यावेळी परिसरातील सर्व वृत्तपत्राच्या प्रतिनिधींची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या