🌟पत्रकार दिनाचे निमित्ताने बुलढाण्यात सहा जानेवारी रोजी पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन......!


🌟पत्रकार आणि पत्रकारांच्या कुटुंबियांनी सहभागी होण्याचे आवाहन🌟 

✍️ मोहन चौकेकर 

 बुलडाणा: लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेला गणले जाते. पत्रकारितेचे व्रत घेवून कल्याणकारी समाजाच्या निर्मीतीसाठी पत्रकार आयुष्य वेचतात. बातमीसाठी तहान-भूक विसरून प्रचंड धावपळ करणारा पत्रकार आपल्या शरीराकडे कमालीचे दुर्लक्ष करतो आणि मग त्याला अल्पवयातच विविध व्याधींशी झगडावे लागते. समाजासाठी समर्पीत असणार्या या घटकाच्या आरोग्याची काळजी घेणे समाजाचीच जबाबदारी आहे.


या उदात्त जाणिवेतून बुलढाणा शहरातील डॉक्टरांच्या विविध संघटनांनी मिळून पत्रकार आणि पत्रकारांच्या कुटूंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे. 6 जानेवारी 2024 रोजी पत्रकार दिनी बुलढाणा येथील बस स्टॅन्ड जवळ असलेल्या पत्रकार भवनात सकाळी 10 वाजता हे शिबीर होणार असून या शिबीरात रक्त तपासणी, ब्लड प्रेशर, शुगर, ईसीजी, सोनोग्राफी, अस्थिरोग, हृदयरोग, ऍसिडीटी, अपचन, पोटविकार यासारख्या विविध आजारांची तपासणी केली जाणार आहे.  या शिबीराचा जिल्ह्यातील सर्व पत्रकार आणि पत्रकाराच्या कुटंबियांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मराठी पत्रकार परिषद संलग्नीत बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ, टिव्ही जर्नलिस्ट असोशियन , मराठी पत्रकार परिषद , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, शासनमान्य पत्रकार संरक्षण समिती, न्यूज पेपर स्मॉल असो., पुरोगामी पत्रकार संघ, रिपब्लिकन न्यूजपेपर असो. आणि महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या